Maharashtra Politics x
महाराष्ट्र

भाजप प्रवेश लटकला अन् सावंताचे मन बदललं, सोलापूरचं राजकारण ३६० डिग्री बदलणार

Maharashtra Politics : शिवसेनेचे माजी जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांचा काही कारणांमुळे भाजपमधील प्रवेश लांबणीवर पडला आहे. यावरून शिवाजी सांवतांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली.

Yash Shirke

  • भाजप प्रवेश लांबणीवर पडल्याने शिवाजी सावंत नाराज

  • प्रवेश होत नसल्यास अन्य पर्याय खुले असल्याचे दिले संकेत.

  • राजकारणात सावंतांच्या निर्णयामुळे उलथापालथीची शक्यता.

भारत नागणे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Maharashtra Political News : शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांचे बंधू आणि शिवसेनेचे माजी जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांचा भारतीय जनता पक्षातील प्रक्षप्रवेश लांबणीवर पडला आहे. भाजप पक्षप्रवेश लटकला असल्याने शिवाजी सावंतांनी अन्य पर्याय खुले असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या या विधानाची चर्चा आहे.

सोलापूर जिल्ह्यातील चार माजी आमदार भारतीय जनता पक्षामध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. या चर्चेला खुद्द पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही दुजोरा दिला आहे. यादरम्यान मागील अनेक दिवसांपासून भाजप पक्षप्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या प्राध्यापक शिवाजी सावंत यांचे नाव मात्र कुठेही चर्चेत नसल्याचे पाहायला मिळत आहे.

मागून येणाऱ्यांच्या पक्षप्रवेशाबाबत चर्चा सुरु असल्याने शिवाजी सावंत अस्वस्थ झाले आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी यापूर्वीही चर्चा केली आहे. पण त्यांना पक्ष प्रवेशासंदर्भात हिरवा कंदील मिळाला नसल्याचे म्हटले जात आहे. यामुळे शिवाजी सावंत यांचा पक्षप्रवेश लांबणीवर पोहोचला आहे.

इतर माजी आमदारांना लवकरच पक्ष प्रवेश दिला जाईल असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जाहीर केले आहे. प्रवेशासंदर्भात अडथळे येत असल्याने शिवाजी सावंत यांनी नाराजी व्यक्त केला. भाजपने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, तर आपल्यासाठी अन्य पर्याय देखील खुले असल्याचे शिवाजी सावंत यांनी जाहीर केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नगरमधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT