आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटासाठी अडचणी वाढताना दिसत आहे. ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार उन्मेष भैय्यासाहेब यांच्यासह ४ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उन्मेष पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेडच्या चाळीसगाव शाखेची तब्बल ५ कोटी ३३ लाख ८५ हजार ३५६ रूपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप ठेवण्यात आला आहे. उमंग व्हाईच गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावाने औद्योगिक कर्ज घेण्यात आले होते. मात्र, वेळेवर न फेडता आल्यामुळे हे कर्ज एनपीए घोषित करण्यात आले.
कर्ज फेडण्यासाठी बँकेकडून वारंवार त्यांना संधी देण्यात आली होती. मात्र, परतफेड न झाल्यामुळे त्यांनी कार्यवाही सुरू केली. या दरम्यान, कंपनीच्या संचालकांनी बँकेकडे गहाण ठेवलेली मशिनरी संगनमताने विकल्याचा आरोप करण्यात आला आहे. देवगिरी बँकेच्या चाळीसगाव शाखेचे व्यवस्थापक जीवन राजूरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जीवन राजूरकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, उन्मेष भैय्यासाहेब पाटील, संजय धनकवडे, प्रशांत वाघ, प्रमोद जाधव या चौघांवर फसवणूक आणि विश्वासघातासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, मंत्री गिरीश महाजन आणि उन्मेष पाटील यांच्यात अलीकडेच भूखंड प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपांची मालिका रंगली होती.
मंत्री गिरीश महाजन यांनी उन्मेष पाटील यांच्याावर गंभीर आरोप केले होते. पाटील यांच्यावर स्टेट बँकेसह इतर एका बँकेलाही आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला होता. विशेष म्हणजे आरोप केल्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.