Raigad Accident Saam TV
महाराष्ट्र

Raigad Accident : मोठी बातमी! ठाकरे गटातील बड्या नेत्याच्या कारला भीषण अपघात; थोडक्यात अनर्थ टळला

Accident News : रायगड जिल्हयातील रोहा येथून शिवसेना ठाकरे गटाचे रायगड लोकसभा मतदारसंघ समन्वयक संजय कदम प्रचार सभा आटोपून मुंबईला परत जात होते. त्यावेळी वाटेतच त्यांच्या कारचा अपघात झाला.

Ruchika Jadhav

सचिन कदम, रायगड

रायगडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे रायगड लोकसभा मतदारसंघ समन्वयक संजय कदम यांच्या कारला भीषण अपघात झालाय. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मुंबई कुर्ला मार्गावर प्रवास करताना संजय कदम यांच्या कारला आयशर ट्रकने मागून जोरदार धडक दिली. या धडकेत कारच्या मागच्या बाजूचा चुराडा झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आयशर ट्रक ताब्यात घेतला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायगड जिल्हयातील रोहा येथून शिवसेना ठाकरे गटाचे रायगड लोकसभा मतदारसंघ समन्वयक संजय कदम प्रचार सभा आटोपून मुंबईला परत जात होते. त्यावेळी वाटेतच त्यांच्या कारचा अपघात झाला. यात गाडीच मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. संजय कदम यांच्यासह कारमधील अन्य व्यक्ती सुखरूप आहेत.

भाजपचे माजी मंत्री डॉ.परिणय फुके यांच्या कारला भीषण अपघात

काही दिवसांपू्र्वी १७ एप्रिल रोजी भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री भाजप नेते डॉ. परिणय फुके यांच्या वाहनाचा देखील भीषण अपघात झाला होता. या अपघातात परिणय फुके थोडक्यात बचावले. तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारला देखील भीषण अपघात झाला होता.

राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना नेत्यांच्या वाहनाला अपघात होण्याच्या घटना वाढतच आहेत. आज देखील संजय कदम प्रचार सभा उरकून घरी जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला. त्यामुळे राजकीय वतृळात एकच खळबळ उडालीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'घरी लग्न आहे, आईचा मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवा', लेकाच्या निर्णयामुळे वडील ढसाढसा रडले, शेवटी आईचं शव मातीत पुरलं

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्र्यांच्या समोरच नवनीत राणा यांनी व्यक्त केली पुन्हा खासदार होण्याची इच्छा

Ajit Pawar: अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनाची धडक, महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

Bharat Jadhav- Mahesh Manjrekar: भरत जाधव अन् महेश मांजरेकर पहिल्यांदाच एकत्र झळकणार, नवीन नाटकाचा प्रयोग कधी?

Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहि‍णींना मिळणार नाहीत ₹१५००; सरकारने दिला इशारा

SCROLL FOR NEXT