Nagpur Accident: नागपूरमध्ये भरधाव कारची ट्रॅक्टरला धडक, दोघांचा मृत्यू तर ५ गंभीर जखमी

Nagpur Car And Tractor Accident: नागपूर जिल्ह्याच्या बुटीबोरी येथे कार आणि ट्रॅक्टरमध्ये भीषण अपघात झाला. वर्धा जिल्ह्यातील रामनगर येथील श्रीवास्तव कुटुंब कारने नागपूरला जात असताना हा अपघात झाला.
Nagpur Car And Tractor Accident
Nagpur Car And Tractor AccidentSaam Tv

पराग ढोबळे, साम टीव्ही नागपूर

नागपूरमध्ये भीषण रस्ते अपघाताची (Nagpur Accident) घटना समोर आली आहे. नागपूर जिल्ह्याच्या बुटीबोरी येथे भीषण अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघाताचा तपास नागपूर पोलिसांकडून (Nagpur Police) सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्याच्या बुटीबोरी येथे कार आणि ट्रॅक्टरमध्ये भीषण अपघात झाला. वर्धा जिल्ह्यातील रामनगर येथील श्रीवास्तव कुटुंब कारने नागपूरला जात असताना हा अपघात झाला. या कारमधून चालकासह श्रीवास्तव कुटुंबातील ७ जण प्रवास करत होते. बुटीबोरीच्या ओव्हर ब्रिजनंतर या भरधाव कारने ट्रॅक्टरला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला आहे.

Nagpur Car And Tractor Accident
Jalgaon News: जळगाव सुवर्ण नगरीतील प्रसिद्ध ज्वेलर्स आयकर विभागाच्या रडारवर

या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर जखमी तर एक जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक नागरिक आणि बुटीबोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल केले जखमींमधील ५ जणांची प्रकृती खूपच गंभीर आहे. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. कारचे वरचे छत पूर्णत: फाटले आहे. या अपघाताचा तपास बुटीबोरी पोलिसांकडून सुरू आहे.

Nagpur Car And Tractor Accident
Hina Gavit News : गोरगरिबांचे हक्काचे घरकुल काँग्रेसच्या पुढार्‍यांनी वाटून खाल्ले; हिना गावित यांची काँग्रेसवर टीका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com