Jalgaon News: जळगाव सुवर्ण नगरीतील प्रसिद्ध ज्वेलर्स आयकर विभागाच्या रडारवर

Jalgaon Ratanlal C Bafna Jewelers: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी करण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान पोलिसांना एका वाहनात सोनं आढळून आलं. या वाहनात ८ ते ९ किलो सोनं आढळून आल्याने आयकर विभाग थेट जळगाव सराफ बाजारात पोहोचले आहे. हे सोनं आरसी बाफना ज्वेलर्सचं असल्याची माहिती समोर आलीय.
Income Tax department Investigation  Ratanlal C Bafna  Jewelers
Income Tax department Investigation Ratanlal C Bafna Jewelers Saam Tv

(संजय महाजन, जळगाव)

Income Tax department Investigation Jalgaon Ratanlal C Bafna Jewelers:

जळगाव शहरातील रतनलाल सी बाफना ज्वेलर्सची आयकर विभागाकडून तपासणी करण्यात आलीय. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर तपासणी सुरू असताना ८ ते ९ किलो सोने चौकशीत आढळून आल्याने आयकर विभागाने थेट जळगावमधील सराफ बाजारात पोहोचले आहे. दरम्यान तपासणीत आढळलेले हे सोने आर सी बाफना ज्वेलर्स असल्याची माहिती समोर आलीय.

जळगाव शहरातील रतनलाल बाफना ज्वेलर्सचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने मुंबई येथून जळगाव शो रूमसाठी येत असतात. अशाच प्रकारे काल रात्रीच्या सुमारास सुरक्षा यंत्रणेसह ९ किलो सोन्याचे आणि १२ किलो चांदीचे दागिने औरंगाबाद आणि मुंबई येथून जळगाव येथे येत होते.

लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर जळगाव औरंगाबाद रस्त्यावर पोलिसांनी नाकाबंदी लावली होती. त्यादरम्यान दागिन्यांची वाहन अडविले होते. यावेळी तपासणीत मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने आढळून आल्याने पोलिसांनी याची माहिती आयकर विभागाला दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आयकर विभागाने रतनलाल सी बाफना ज्वेलर्स येथे या दागिन्यांच्या बाबत तपासणी केली.

या तपासणीसाठी जळगाव आणि नाशिक येथील आयकर विभाग कर्मचारी सहभागी झाले होते. आपल्याकडे येत असलेला सोन्याचे दागिने हे पूर्णपणे कायदेशीर मार्गाने येत होते. त्याची संपूर्ण माहिती आपण पोलिसांना आणि आयकर विभागाला दिली आहे. त्यावर त्यांचे समाधानदेखील झाले असून चौकशीसाठी ताब्यात घेतलेले दागिने २- ३ दिवसात परत मिळतील, असे त्यांच्याकडून सांगण्यात आल्याचं रतनलाल बाफना ज्वेलर्सचे संचालक सुशील बाफना यांनी म्हटलं आहे.

Income Tax department Investigation  Ratanlal C Bafna  Jewelers
Dhule News : धुळे जिल्हा पोलीस दलाचे मध्यरात्री ऑल आऊट मिशन; मोठा शस्त्र साठा जप्त

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com