शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणाची सुप्रीम कोर्टात सुनावणी
ठाकरे की शिंदे शिवसेना पक्ष कुणाचा? हे ठरणार
शिंदे गटाचा आज शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर युक्तिवाद
उद्धव ठाकरे गटाची शिवसेना पक्ष चिन्हाबाबत मागणी
Shiv Sena Name and Election Symbol Row: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. शिवसेनेतील (उद्धव ठाकरे गट) फुटीनंतर आमदारांना अपात्र न ठरवण्याच्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या २०२४ च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात गेल्या काही दिवसांपासून सुनावणी सुरू आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा युक्तीवाद आधीच पूर्ण झाला आहे. आता शिवसेना शिंदेगटाकडून युक्तीवाद सुरू झाला आहे.
शिवसेना ठाकरे गटाने धनुष्यबाण चिन्ह जर आम्हाला मिळणार नसेल तर ते गोठवून टाका असा युक्तीवाद सुप्रीम कोर्टात सुनावणीदरम्यान केला होता. त्यानंतर शिंदेसेनेकडून युक्तीवादाला सुरूवात झाली. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह प्रकरणी आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे. दुपारी २ वाजता सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत, न्यायमूर्ती जोयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर ही महत्वाची सुनावणी पार पडणार आहे. आज शिंदेसेनेकडून वकील निरज किशन कौर आपला युक्तीवाद मांडणार आहे.
शिवसेना एकनाथ शिंदे गटालाच 'अधिकृत शिवसेना' म्हणून मान्यता देण्याच्या निवडणूक आयोगाच्या (ECI) निर्णयाला आव्हान देणारी याचिका आजच्या कामकाज यादीत समाविष्ट करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय आणि पक्षांतर लोहशाहीच्या मुद्द्यावर आता कोर्टाकडे नेमका काय युक्तीवाद होतोय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं असूनआजच्या सुनावणीत काय घडणार? कोणाच्या बाजूने काय युक्तिवाद होणार? हे पाहणे महत्वाचे राहिल.
आजच्या सुनावणीदरम्यान एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची बाजू ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल हे मांडणार आहेत. शिवसेना पक्ष-चिन्हाच्या दाव्यावर आज शिंदेंच्या शिवसेनेकडून युक्तीवाद केला जाईल. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून विधानसभा अध्यक्ष, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवण्यात आला आहे. ठाकरे गटाकडून विधिमंडळातील पक्ष आणि राजकीय पक्षावरील भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. आजच्या सुनावणीत याच मुद्याला शिंदेसेनेकडून उत्तरं दिली जाणार आहेत. शिंदेसेनेकडून काय युक्तीवाद केला जातोय ते पाहणं महत्वाचे राहिल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.