Shivsena Dispute : ...तर ठाकरे-शिंदे एकत्र येऊ शकतात; शिंदेसेनेच्या बड्या नेत्याचं भाकित, EXCLUSIVE

Can Thackeray and Shinde Sena factions join hands in Maharashtra politics : दोन्ही शिवसेना एकत्र येणार का? असा प्रश्न साम टीव्हीवरील ब्लॅक अँड व्हाइट या कार्यक्रमात सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक नीलेश खरे यांनी विचारल्यानंतर मंत्री प्रताप सरनाईक यांनी नेमकं काय उत्तर दिलं? बघा व्हिडिओ एक्स्क्लुझिव्ह.

महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढील दिशा स्पष्ट करणारे संकेत शिंदे गटाचे नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. भविष्यात दोन्ही शिवसेना म्हणजेच ठाकरे गट आणि शिंदे गट एकत्र येऊ शकतात, असं सांगतानाच एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांचा नामोल्लेख केला.

एकनाथ शिंदे आणि मातोश्रीवरून होकार मिळाला तर दोन्ही शिवसेना एकत्र येऊ शकतात का, असा प्रश्न सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक नीलेश खरे यांनी साम टीव्हीवरील ब्लॅक अँड व्हाइट या एक्स्क्लुझिव्ह कार्यक्रमात शिंदेसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना विचारला. त्यावर सरनाईक यांनी स्पष्ट उत्तर दिले.

राजकारणात जर-तर हे कायम असतं. एकनाथ शिंदे जी भूमिका घेतील, ती आम्हाला सगळ्यांना मान्य असते. त्यांना एखादी योजना आणावी वाटली तर, आम्ही त्याला होकार देऊन मंजुरी देऊ. ठाकरे सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एकत्र येऊन महाविकास आघाडीचं सरकार राज्यात येईल, असं कधी वाटलं होतं का? त्यावेळी उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतला. त्यावेळी मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे मंत्री होते. आम्हीही ते मान्य केले. पण अशा काही युती-आघाड्या किती काळ, किती दिवस, किती वर्षे टिकतात, हा देखील महाराष्ट्राच्या राजकारणातला इतिहास आहे. अशा काही युती-आघाड्या फार काळ टिकत नाहीत, असं सरनाईक म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com