Suhas Kande Bodyguard Nashik Hotel Incident Saam Tv
महाराष्ट्र

Nashik News: शिवसेना आमदाराच्या बॉडीगार्डचा प्रताप, हॉटेलमध्ये बंदुक रोखली, घटना CCTV मध्ये कैद

Suhas Kande Bodyguard Nashik Hotel Incident: शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने शासकीय रिव्हॉल्व्हर ताणून हॉटेलच्या वेटरला धमकावले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Priya More

Nashik Road Hotel CCTV viral video of gun threat:

नाशिकमधील नाशिक रोड रेल्वेस्थानकातील एका हॉटेलमध्ये जेवण करत असताना शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने शासकीय रिव्हॉल्व्हर ताणून हॉटेलच्या वेटरला धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. विशाल झगडे असं या अंगरक्षकाचं नाव आहे. विशाल झगडेविरोधात नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा संपूर्ण प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

विशाल झगडे हा नाशिक ग्रामीण पोलिस दलामध्ये अमलदार म्हणून कार्यरत आहे. सागर निंबा पाटील यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक रोड येथील हॉटेल रामकृष्णमध्ये ते व्यवस्थापक आहेत. शुक्रवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ते हॉटेलमध्ये असताना संशयित पोलिस विशाल झगडे हा हॉटेलमध्ये दोन साथीदारांसह जेवण करण्यासाठी आला होता.

विशाल झगडेने हॉटेलमधील वेटर सिरॉन शेखला बोलाविले. त्यावेळी बोलताना विशाल झगडेने वेटरला शिवीगाळ केली. त्यावरून वेटर बोलला असता झगडेने त्याच्याकडील शासकीय रिव्हॉल्व्हर काढून वेटर शेख याच्यावर ताणली आणि त्याला शिवीगाळ करत धमकावले. या प्रकारामुळे वेटरसह हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आलेल्या ग्राहकांमध्ये भीती निर्माण झाली.

संशयित पोलिस विशाल झगडे याच्याविरोधात सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करण्यासह शस्त्र दाखवून धमकावणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक रोड पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक पवार याबाबत पुढील तपास करत आहे. या घटनेची सध्या नाशिकमध्ये चर्चा होत आहे. नाशिक रोड पोलिसांनी विशाल झगडेविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor Missing : 'मुन्ना भाई एमबीबीएस'मधील लोकप्रिय अभिनेता बेपत्ता; गर्लफ्रेंडसोबत होती भांडणं, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Accident News : समृद्धी महामार्गावर एका रात्रीत चार अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! ५ वर्षात मिळणार ५ लाखांचं व्याज; वाचा सविस्तर

Lifestyle: हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्यामागे आपल्या 'या' घाणेरड्या सवयी कारणीभूत; धोका कोणाला जास्त?

SCROLL FOR NEXT