Nashik News: खराब भाज्या, कीड आलेले धान्य अन् बुरशी आलेले खजूर, आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ?

Hiraman Khoskar: नाशिक जिल्ह्यात सडका भाजीपाला, कीड लागलेलं धान्य, बुरशी लागलेली खजूर आणि कच्च्या पोळ्या जेवणात दिल्या जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
Nashik News: खराब भाज्या, कीड आलेले धान्य अन् बुरशी आलेले खजूर, आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ?
Published On

नाशिक जिल्ह्यातील ४४ आश्रम शाळांमध्ये १८ हजार विद्यार्थ्यांना जेवण देणाऱ्या सेंट्रल किचनमधील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सडका भाजीपाला, कीड लागलेलं धान्य, बुरशी लागलेली खजूर आणि कच्च्या पोळ्या जेवणात दिल्या जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. आमदार हिरामण खोसकर यांनी अचानक भेट देऊन हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला.

आदिवासी विभागातील अधिकाऱ्यांना फोन करून खोसकरांनी जाब विचारला. जनावरे देखील खाणार नाही, इतकं निकृष्ट दर्जाचं जेवण विद्यार्थ्यांना दिलं जातंय. आदिवासी आयुक्त यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे, खोसकरांची मागणी आहे. ठेकेदाराकडून अधिकाऱ्यांना हफ्ता जात असल्याचा देखील खोसकर यांचा गंभीर आरोप आहेत. वेळ पडली तर उपोषण देखील करणार असे ते म्हणाले.

Nashik News: खराब भाज्या, कीड आलेले धान्य अन् बुरशी आलेले खजूर, आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ?
Pune Metro: पुणेकरांसाठी गुडन्यूज! मेट्रो रात्री 11 वाजेपर्यंत धावणार, जाणून घ्या नवीन वेळापत्रक

हिरामण खोसकर म्हणाले की, मी सेंट्रल किचनची अचानक पाहणी केली, भयानक परिस्थिती, पाहावी वाटत नाही. सडलेले टोमॅटो, बुरशी लागलेली खजूर, बदाम खराब, किडे पडलेले धान्य, उंदीर तिथं खेळतात, रस्त्यावरचा भिकारी सुद्धा खाणार नाही. ४४ शाळेला हे जेवण पाठवलं जातं, संपूर्ण महाराष्ट्रात हे सुरू आहे. कंत्राट देताना वेगळं सांगतात, अधिकारी त्यांना पाठीशी घालतात. आम्ही आदिवासी आमदार सुद्धा जबाबदार, 24 आमदार या पापातील वाटेदार आहेत. वाटाणा, कांदा, टोमॅटो, अंडे यावर उंदीर खेळतात.

Nashik News: खराब भाज्या, कीड आलेले धान्य अन् बुरशी आलेले खजूर, आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ?
Mumbai Crime: मुंबईत आईनेच पोटच्या मुलाचा गळा आवळला, धक्कादायक कारण आलं समोर

विचारायला गेलो तर हप्ते सुरू आहे असे कंत्राटदार सांगतो, मग कुणाला हप्ते सुरू आहे. आदिवासी आयुक्त, अप्पर आयुक्त आणि प्रकल्प अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी हिरामण खोसकर यांनी केली आहे. जो पर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. आदिवासी आयुक्त सोमवारी येणार आहे मी त्यांच्याकडे मांडणार. आमचे मुलं कुपोषित राहणारच ना? कारवाई होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण करणार असे ते म्हणाले.

Nashik News: खराब भाज्या, कीड आलेले धान्य अन् बुरशी आलेले खजूर, आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ?
Passport Confiscate: हा अधिकार पोलीस आणि न्यायालयाला नाही तर..., पासपोर्ट जप्तीच्या कारवाईवर हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

त्यांना काळ्या यादीत टाकलं पाहिजे, २८ कंत्राटदार आहेत, अधिकाऱ्यांचे लागेबांधे असलेले कंत्राटदार आणि तेच संपूर्ण राज्यात आहे. नवीन कंत्राटदार हे घुसू देत नाही. कंत्राटदार म्हणतो वर पैसे द्यावे लागतात. मी तर काही घेत नाही. जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. ऑफिसला भेट देऊन चालत नाही, कारवाई झाली पाहिजे. अधिवेशनाला गेल्यावर मी सभागृहात जाणार नाही, बॅनर लावून मी पायरीवर बसून आंदोलन करणार. संपूर्ण महाराष्ट्रात असा प्रकार सुरू आहे, मी थांबणार नाही असे हिरामण खोसकर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com