Sanjay Shirsat on Uddhav Thakeray : भाजपा नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेनेचा बाबरी पाडण्याशी कोणताही संबंध नसल्याचा खळबळजनक दावा केला. त्यांच्या या दाव्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकारपरिषद घेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. (Latest Marathi News)
बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन सत्तेवर बसला आहात ना? आता भाजपाने बाळासाहेब ठाकरेंचा अपमान भाजपाने केला आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे कुणाला जोडा मारणार आहेत? की स्वतःच्या तोंडावर जोडा मारून घेणार आहेत? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) विचारला. दरम्यान, ठाकरेंच्या आरोपाला शिंदे गटाचे संभाजीनगरचे आमदार संजय सिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (Breaking Marathi News)
बाळसाहेबांचा अपमान झाला म्हणता, त्यांचा अपमान करण्याची ताकत कुणाची नाही असे सांगत ब स्वाभिमान आम्हाला शिकवू नये, जे आज बोलताय ते त्या आंदोलनात कुणीही नव्हते त्यामुळं आम्हाला लाज विचारण्याआधी लाज तुम्हालाच वाटली पाहिजे, असं संजय शिरसाठ म्हणाले. उद्धव ठाकरे म्हणायचे शरद पवार, राहुल गांधी चोर आहे, मग आता ते संत झाले का, तुम्ही त्यांचा मांडीवर जाऊन बसले आहेत म्हणून असा सवालही संजय सिरसाट यांनी केला.
त्याचबरोबर त्यांच्या स्टेटमेंटची फार दखल घ्यायची गरज नाही, आम्ही काय करावे हे तुम्ही सांगू नका, आम्हाला काय करायचं ते आम्ही करू, आम्ही बाळासाहेबांचा सन्मान करायलाच काँग्रेस आणि एनसिपीला सोडून उठाव केला असेही सिरसाट म्हणाले. (Maharashtra Political News)
दरम्यान, संजय सिरसाट यांनी यावेळी चंद्रकांत पाटील यांचेही कान टोचले. "चंद्रकांत दादांनी असे स्टेटमेंट करू नये, हे मी आवर्जून सांगेल, दादांना त्यांच्या दुर्बिणीतून अनेक लोक दिसले नसावे. मात्र या आंदोलनाचे अनेक नेते होते हे सुद्धा आपण पाहिलं आहे".
महाराष्ट्राची अवस्था पाकिस्तान सारखी झाली आहे, अशी घणाघाती टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला सिरसाटांनी जोरदार टोला लगावला. आदित्य ठाकरे हे एरवी राहुल गांधी सोबत गळाभेट घेतात, शेकहॅन्ड करतात त्यामुळे ते असं काही बोलत असावे, असं शिरसाठ म्हणाले.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.