Khultabad Rename As Ratnapur Saam Tv
महाराष्ट्र

Sanjay Shirsat: छत्रपती संभाजीनगरमधील 'या' शहराचं नाव बदलणार? संजय शिरसाट म्हणाले, चूक दुरुस्त करायचीय

Khultabad Rename As Ratnapur : खुलताबादचे नाव पुन्हा रत्नपूर करावे, अशी मागणी शिवसेना नेते आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केलीय. ते एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलत होते.

Bharat Jadhav

खुलताबादचे नाव बदलण्यात यावे, या शहराला आधी असलेलं 'रत्नपूर' हे नाव द्यावं, अशी मागणी शिवसेना आमदार आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केलीय. खुलताबादमधील औरंगजेबच्या कबरीवरून राज्यातील राजकारण खूप तापलं होतं. त्यामुळे आता खुलताबादच्या नामकरणावरून पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे. खुलताबादचे नाव बदलण्याबाबत शिरसाट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देणार आहेत.

खुलताबादचे नामांतर होणार नाहीये, तर झालेली चूक दुरुस्त करायची आहे. याआधी खुलताबादचे नाव रत्नपूर होते, ते रेकॉर्डवर आहे. तेच नाव देण्यात, यावे अशी मागणी मंत्री संजय शिरसाट यांनी केलीय. शिरसाट यांनी एका मराठी वृत्तसंस्थेला मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांनी खुलताबादच्या नामकरणावरून भाष्य केलं.

मुलाखतीमध्ये बोलताना शिरसाट म्हणाले, खुलताबादचे नाव आधी रत्नपूर होते, हे रेकॉर्डवर आहे. इंग्रजांनीही येथे सत्ता उपभोगलीय. ब्रिटीश येथून शेतसारा वसूल करत. शेतसारा वसूल करण्याच्या नोंदीमध्ये खुलताबादचे नाव 'रत्नपूर' असं लिहिलेले आहे. त्यामुळे नवीन नाव द्यावे,अशी मागणी आम्ही करत नाहीत. जे आधी नाव होत ते द्यावी अशी मागणी करत आहोत. या मुलाखतीत पुढे बोलताना शिरसाट म्हणाले, दौलताबादचे नाव दौलताबाद नाहीये, तर ते देवगिरी आहे. त्याला देवगिरी प्रांत म्हटलं जात होतं. राजा रामदेवराय यांनी तेथे राज्य केलं होतं. आता दौलताबाद किल्ला औरंगजेबाने बांधलाय का? नाही. तेथे असलेली वास्तू आहे, तेथे राज्य केलंय.

आपण जे नामांतर म्हणतो ना, तर हे नामांतर नसून झालेली चूक दुरुस्त करण्याचे काम आहे, ते आम्ही करतोय. त्याचे कारण आम्ही औरंगजेबाची कबर खोदण्याचा विषय काढला, त्याचा काही लोकांना त्रास झाला. मग त्यांना स्वाभिमान आहे, मग आम्ही आमचा स्वाभिमान जागृत करायला नको का? असा सवाल मंत्री शिरसाट यांनी उपस्थित केला. दरम्यान नाव बदलण्याबाबत संजय शिरसाट हे मुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहेत.

नाव बदलाची तांत्रिक गोष्ट असते. त्याला विधानसभेत मान्यता घ्यावी लागते. त्यानंतर तो प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा लागतो. केंद्राची मान्यता मिळाली तरच नाव बदलता येते. ज्याप्रकारे धाराशीव आणि अहमदनगरचे नामकरण झाले त्याप्रमाणे खुलताबादचे नाव बदलण्यात येईल, असं संजय शिरसाट म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT