Aurangzeb Tomb: औरंगजेबची कबर उखाडून टाका नाहीतर...; मंत्री नितेश राणेंचा थेट सरकारला इशारा

Minister Nitesh Rane on Aurangzeb Tomb: औरंगजेबची कबर हटवण्यावरून भाजप मंत्री नितेश राणे यांनी थेट सरकारलाचा इशारा दिलाय. पुण्यातील एका कार्यक्रमात बोलतांना छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारणार असल्याची घोषणाही त्यांनी केलीय.
Nitesh Rane
Minister Nitesh Rane on Aurangzebs Tomb:Saam Tv
Published On

गेल्या काही दिवसांपासून मुघल शासक औरंगजेबवरून राज्यातील राजकारणात मोठा वाद सुरू आहे. विधानसभेत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबचं कौतुक करणारे विधान केले. त्यांच्या वादग्रस्त विधानापासून राज्यातील राजकारणात औरंगजेबचा मुद्दा पेटलाय. याचदरम्यान छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबची कबर उखाडून फेकून द्यावी, अशी मागणी जोर धरू लागलीय. आता कबर हटवण्यावरून भाजप मंत्री नितेश राणे यांनी थेट सरकारलाच इशारा दिलाय.

कबर हटणार की नाही?

छत्रपती संभाजी महाराज यांचा वध करणाऱ्या औरंगजेबची कबर हटवण्यात यावी. तो काही आदर्श राजा नव्हता, त्याची कबर उखाडून द्यावी, अशी मागणी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह मंत्री नितेश राणे यांनी मागणी केलीय. त्याचबरोबर शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी देखील ही मागणी केली.

Nitesh Rane
CM Fadnavis: नियमबाह्य भोंग्याविरोधात मुख्यमंत्री आक्रमक; कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर चढवला आवाज

भाजपसहित अनेक हिंदू संघटना औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करताहेत. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीय. औरंगजेबाच्या कबरीला कायदेशीर संरक्षण आहे. कबरीला देण्यात आलेलं विशेष संरक्षण कायद्याचं पालन करून हटवणं अथवा बदलवणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. यामुळे या प्रकरणात घाईघाईने कोणताही निर्णय घेता येणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

नितेश राणेंचा सरकारला इशारा

कबर संदर्भात घाईने निर्णय घेता येणार नाही असं मुख्यमंत्री म्हणतात, तर दुसरीकडे आमदार नितेश राणे यांनी ही कबर किती दिवस राहील हे पाहा, असे संकेत दिलेत. औरंगजेबची निशाणी नष्ट करण्यात आलीय. आता औरंगजेबची कबर उखाडून काढू. सरकारने काढली नाही तर कबर काढण्यासाठी लाँग मार्च काढू, असा इशारा नितेश राणे यांनी दिलाय.

Nitesh Rane
Maharashtra Politics: अबू आझमींना मुंबईच्या सत्र न्यायालयाचा मोठा दिलासा; अटकेचं संकट टळलं!

छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक

कसबा शास्त्रीपूल या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज धर्मरक्षण दिन साजरा केला गेला. यावेळी बोलताना नितेश राणे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाविषयी मोठी घोषणा केली. छत्रपती संभाजी महाराज यांचे सर्वात मोठे स्मारक उभारू. जगभरातील पर्यटक या ठिकाणी येऊन तेथे नतमस्तक होतील. हिंदू नावे लागली आहेत ती धर्मवीर संभाजी महाराजांच्यामुळे लागली आहेत, असंही मंत्री नितेश राणे म्हणालेत.

Nitesh Rane
MSRTC Bus: कुठं अन् कोणत्या रस्त्यावर आहे लालपरी? प्रवाशांना मोबाईलवर कळणार बसचं लोकेशन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com