MSRTC Bus: कुठं अन् कोणत्या रस्त्यावर आहे लालपरी? प्रवाशांना मोबाईलवर कळणार बसचं लोकेशन

State Road Transport Corporation : एसटी महामंडळाने 'व्हीएलटी'डिव्हाइस तयार केलंय. यातून बसचे थांबे आणि स्थानकामध्ये बस कधी येईल याची माहिती मिळणार आहे.
State Road Transport Corporation
MSRTC Bus saam tv
Published On

एसटी ही ग्रामीण भागाची जीवनवाहिनी आहे. लाखो लोक एसटीने प्रवास करतात. परंतु अपुऱ्या तंत्रज्ञानामुळे एसटीचं संचालन कोलमडत असतं. बहुदा गावात किंवा बस स्टँडवर बसची वाट पाहत तासन् तासभर वाट पाहावी लागते. एसटी बसची वेळ माहित नसल्याने कधी-कधी प्रवाशांना ताटकळत उभं राहावं लागतं. मात्र आता प्रवाशांचा त्रास कमी होणार आहे. प्रवाशांना एसटीचे लाइव्ह लोकेशन समजणार आहे.

लांबपल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आगाऊ तिकीट काढूनही बस कुठे आहे किंवा बस कुठंपर्यंत आली? कधीपर्यंत बस स्थानकावर येणार याची माहिती मिळत नसते. परिणामी प्रवाशांना बसची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागते. प्रवाशांची ही समस्या लक्षात घेत महामंडळाने 'व्हीएलटी'डिव्हाइस तयार केले आहे. याच्या मदतीने बसचे थांबे आणि स्थानकामध्ये बसचा येण्याचा अपेक्षित वेळ आधीच समजणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.

State Road Transport Corporation
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी; २६३ रिक्त पदे; अर्ज कुठे अन् कसा कराल?

राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक अॅप विकसित केलंय. या अॅपच्या मदतीने प्रवाशांना त्यांच्या तिकिटावरून लालपरीचं लाइव्ह लोकेशन समजणार आहे. प्रवाशांना बस कधी बस स्टॅण्डवर येणार कधी, सुटणार? याची अचूक माहिती मिळणार आहे. एसटीच्या ताफ्यातील सर्वच बसगाड्यांना व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम (व्हीएलटी) बसविल्यानंतर या अॅपवरून बसची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यावर ही सुविधा सुरू होण्याची शक्यता आहे.

State Road Transport Corporation
MSRTC: राज्याची जीवनवाहिनी ST चा बदलणार चेहरामोहरा; एअरपोर्टप्रमाणे होणार एसटी डेपो

अॅपमधील 'ट्रॅक बस' या सुविधेत तिकिटावरील ट्रिप कोड टाकल्यावर बसचं लाइव्ह लोकेशन समजणार आहे. त्यातून इतर मार्गावरील गाड्यांचे थांबे देखील समजणार आहे. एसटीच्या मुंबई सेंट्रल मध्यवर्ती कार्यालयात अद्ययावत नियंत्रण कक्षाची स्थापना केलीय. त्याद्वारे राज्यभरातील एसटीवर नियंत्रण करण्यात येतील. एसटी बिघडली किंवा अपघात झाल्यास या अ‍ॅपमधून यंत्रणांना फोन करण्याची सुविधादेखील असणार आहे.

चालक आणि वाहक यांचीही माहिती यात उपलब्ध करून देण्यात आलीय. एखाद्या मार्गावर किती बस आहेत, कोठे आहेत आणि स्थानकावर पोहोचण्यास किती वेळ लागेल याची माहिती यातून मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com