MSRTC: राज्याची जीवनवाहिनी ST चा बदलणार चेहरामोहरा; एअरपोर्टप्रमाणे होणार एसटी डेपो

Eknath Shinde Announcement On ST : राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एसटीचा चेहरामोहर बदलणार असून त्यासाठी नवीन उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिलीय.
MSRTC
Eknath Shinde Announcement On ST saam tv
Published On

लालपरी ही राज्याची जीवनवाहिनी आहे, आता एसटीचा पूर्ण चेहरामोहरा बदलणार आहोत. राज्यातील सर्व एसटी डेपो एअरपोर्टप्रमाणे केले जातील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय. एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील खपोट येथील बस आगाराला भेट दिली. यावेळी बोलताना त्यांनी महामंडळाची पुढील वाटचाल कशी असेल याचे सुतोवाच केले.

राज्यातील शहरी भाग आणि दुर्गम भागाला सोडणाऱ्या एसटीचा कायापालट लवकरच होणार आहे. राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एसटीत मोठे बदल केले जाणार आहेत. दरम्यान कर्नाटक राज्याच्या परिवहन सेवेची लांब पल्ल्याची गाड्याची सेवा जशी आहे, तशीच सेवा राज्यातील प्रवाशांना एसटी बसची सेवा दिली जाणार आहे. याबाबत ही माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

कर्नाटक दौऱ्यावर असताना बंगळुरू येथील कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुख्यालयाला सरनाईकांनी भेट दिली होती. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एसटीचा चेहरामोहरा बदलण्यात येणार तसेच राज्यातील परिवहनसेवा फाइव्ह स्टार केली जाणार असल्याचं सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील खपोट बस आगारात लोकाभिमुख कार्यक्रम राबवण्यात आले.

MSRTC
Bacchu kadu: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्राच अधिक चांगलं होईल : बच्चू कडू

त्याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून अनेक लोकाभिमुख कार्यक्रम राबवल्याने मला आज अभिमान वाटतोय. अडीच कोटी बहिणींनी त्यांच्या लाडक्या भावाला साथ दिल्याचा मला समाधान आहे. २३८ आमदार आम्हाला दिले याचा ही अभिमान वाटतोय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खपोटच्या आगाराला भेट दिल्यानंतर म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना खोपट आगराला भेट दिली होती. त्यावेळी वाहक आणि चालकाच्या वसती गृहात दुरावस्त होती त्यावेळी आदेश दिले होते .

MSRTC
Maharashtra Politics : ठाकरे गटातील माजी आमदार फुटणार, शिंदेंची भूमिका उबाठाच्या लोकांना पटली, शिवसेना नेत्याचं मोठं वक्तव्य

आदेशाप्रमाणे आज एसटीच्या वाहक आणि चालकांसाठी वातानुकूलित विश्रतीगृह आणि गरम पाण्याची अशी अद्ययावत सेवा पुरवण्यात आलीय. खोपट आगराचा पॅटर्न संपूर्ण राज्य भरतील आगरात राबवण्यात येईल. लालपरी ही राज्याची जीवन वहिनी आहे आता एसटीचा पूर्ण चेहरामोहरा बदलणार आहोत. राज्यातील सर्व एसटी डेपो एअरपोर्टप्रमाणे तयार करण्यात येणार आहे. सर्व एसटी डेपोट कॅश लेस हॉस्पिटल तयार करण्यात येणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com