Maharashtra Politics : ठाकरे गटातील माजी आमदार फुटणार, शिंदेंची भूमिका उबाठाच्या लोकांना पटली, शिवसेना नेत्याचं मोठं वक्तव्य

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सभासद जोडणे अभियान सुरु आहे. या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान ठाकरे गटाचे अनेक जण शिंदे यांच्या संपर्कात असल्याचेही म्हटले जात आहे.
Eknath shinde
Eknath shindeSaam Tv
Published On

पराग ढोबळे, साम टीव्ही, प्रतिनिधी

नागपूर : उद्धव ठाकरे यांनी शिंदेंच्या शिवसेनेला खुले आव्हान दिले होते. हिंमत असेल तर आमचे खासदार फोडून दाखवा. ईडी आणि सीबीआयला बाजूला ठेवून समोर या असे म्हणत ऑपरेशन टायगरवर प्रहार केला होता. यावर उद्योग मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'कोणी आव्हान दिल्यावर प्रति आव्हान देणं गरजेचे नसते' असे विधान सामंत यांनी केले आहे.

उदय सामंत म्हणाले, "प्रत्येकाच्या मनात काय असतं, कुठं जायचं कोणी सांगत नाही. दिल्लीत पत्रकार परिषदेमध्ये वज्रमूठ असल्याचे त्यांनी सांगितले. ही मूठ किती दिवस टिकेल बघूयात. कोणी आव्हान दिलं, तर त्याला प्रति आव्हान देत राहणं गरजेचे नसते. शिंदे शिवसेनेची भूमिका आता उबाठाच्या लोकांना पटली आहे. एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या विचाराने चालत आहेत. ठाकरे गटातील माजी १० ते १२ माजी आमदार, खासदारकीचे आणि आमदारकीचे उमेदवार हे एकनाथ शिंदेंचं नेतृत्व स्वीकारतील. याची सुरुवात झाली आहे."

"उद्धव ठाकरे यांच्या आव्हानावर मला फारसं बोलायचं नाही. आम्हाला शिवसेना वाढवायची आहे. पायाला भिंगरी बांधून एकनाथ शिंदे पक्षाचे काम करत आहेत. शिवसेनेचे सभासद जोडणे अभियान सुरु आहे. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. संघटनात्मक शिवसेना ताकदीने उभी राहिली पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे", असे उदय सामंत म्हणाले.

Eknath shinde
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाला दोन महिने पूर्ण; सर्व आरोपी फासावर जावे, सुरेश धस यांची देवाकडे प्रार्थना

याशिवाय उदय सामंत यांनी राजन साळवी यांच्या प्रवेशावरही भाष्य केले. "एकनाथ शिंदे यांच्यासोबत माझी चर्चा झालेली नाही. राजन साळवींना पक्षात घेताना त्यांच्या इच्छा-आकांक्षा काय आहेत? यावर आम्ही सविस्तर चर्चा करु. माझ्या मोठ्या बंधूंनी राजन साळवींचा पराभव केला होता. तेव्हा त्यांनाही विश्वासात घ्यायचे आहे. आम्ही मिळून सर्व बाबींचा विचार करु," असे वक्तव्य उदय सामंत यांनी केले आहे.

Eknath shinde
Sanjay Raut : 'अमित शाह शिंदेंचं ऑपरेशन कधी करतील, ते त्यांनाही कळणार नाही' संजय राऊत यांचं रोखठोक विधान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com