CM Fadnavis: नियमबाह्य भोंग्याविरोधात मुख्यमंत्री आक्रमक; कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर चढवला आवाज

CM Devendra Fadnavis On Loudspeaker: भोंग्यांसंदर्भात केंद्र सरकारनेही नियमात बदल केला पाहिजे. त्या बदलामुळे आम्हालाही कडक कारवाई करता येईल, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
CM Devendra Fadnavis
CM Devendra Fadnavis On LoudspeakerSaam Tv
Published On

प्रार्थानास्थळे आणि इतर ठिकाणी असलेल्या भोंग्याबाबत सरकारने नियमावली तयार केलीय. नियमबाह्या आवाज करणाऱ्या भोंग्यावर आता नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. आज विधानसभेत झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात संबंधित पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांवर याबाबत जबाबदारी देण्यात आलीय. जर पोलीस निरीक्षकांनी कारवाई केली नाही तर त्यांच्यावरच कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलाय.

राज्यातील भोंग्यांबाबत नियमावली आता लागू होणार आहे,अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय. आमदार देवयानी फरांदेंनी राज्यातील भोंग्यांसंदर्भात प्रश्न विधानसभेत उपस्थित केला. भोंग्यावर कारवाई केली जाणार का, असा सवाल फरांदे यांनी केला. त्यावर आपल्याला समाधानकारक उत्तर मिळालं नसल्याचं फरांदे म्हणाल्या.

CM Devendra Fadnavis
Maharashtra Budget: निधी वाटपावरून महायुतीत पुन्हा धुसफूस; शिंदेंना कमी, भाजप अन् अजित पवार गटाला सर्वाधिक निधी

भोंगा हा कुठल्याही धार्मिक भावनेशी निगडित नाहीये. त्यामुळे ध्वनी प्रदूषण होतं असतं. भोंगे बंद करण्यासाठी पत्र दिले होते. पण तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने तेव्हा कारवाई केली नाही. पण दुसरीकडे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या राज्यात बेकायदेशीर भोंग्यावर कारवाई केली. त्यावरून महाराष्ट्र सरकार भोंगे बंद करणार का? असा प्रश्न आमदार फरांदे यांनी केला.

CM Devendra Fadnavis
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या एका जागेसाठी इच्छुकांची तोबा गर्दी; राष्ट्रवादीतील 100 हून अधिक नेत्यांचे अर्ज

आमदार फरांदे यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. कुठेही भोंगा लावताना त्याची परवानगी घेणं आवश्यक आहे. भोंगे रात्री १० वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत बंद असले पाहिजे. सकाळी ६ ते रात्री १० वाजतेपर्यंत भोंगे लावता येणार आहे. तर दिवसा भोंग्याचा आवाज ५५ डेसिबल आणि रात्री डेसिबलपर्यंत असला पाहिजे. त्यापेक्षा जास्त मर्यादा असू नये, असे निर्देश देण्यात आलेत. या संदर्भात कायद्यानुसार अधिक डेसिबल एखादा भोंगा वाजत असेल तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाला कारवाई अधिकार केंद्र सरकारने दिलेत. त्यानुसार मंडळाने पोलिसांनी कळवायला हवे. त्यानंतर मंडळानेच कोर्टात केस टाकावी. आरोपपत्र दाखल केले पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com