Maharashtra Budget: निधी वाटपावरून महायुतीत पुन्हा धुसफूस; शिंदेंना कमी, भाजप अन् अजित पवार गटाला सर्वाधिक निधी

Shinde Group gets the least funds: निधीवाटपावरूनह महायुतीत सगळं काही अलबेल नसल्याचं चित्र आहे. भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला जास्त तर, शिंदे गटाला कमी निधी मिळाला आहे.
Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde
Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath ShindeSaam Tv
Published On

अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. महायुतीमध्ये निधीवाटपही झाला. मात्र, निधीवाटपावरूनही सगळं काही अलबेल नसल्याचं चित्र आहे. भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला जास्त तर, शिंदे गटाला कमी निधी मिळाला आहे.

गेल्या वर्षी शिंदेंच्या नगरविकास विभागाला ६८६०१.२० कोटी रूपयांचा निधी मिळाला होता. पण यंदा १०३७९.७३ कोटी रूपये कमी निधी मिळालं आहे. त्यामुळे शिंदे गटाची पुन्हा एकदा नाराजी दिसून येईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सरकार स्थापन झाल्यापासून तिन्ही पक्षात सगळं काही अलबेल नसल्याची चर्चा असताना आता अर्थसंकल्पात निधी वाटपातही भाजप आणि अजितदादा गटानं शिंदे गटावर कुरघोडी केली असल्याचं म्हटलं जातंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्यातील १० हजार कोटींचा निधी कापला असून,यामुळे शिंदे गट पुन्हा नाराज होईल अशी चर्चा आहे.

Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde
Shocking Crime: महाराष्ट्रात चाललंय काय? तुझी बायको एका रात्रीसाठी पाठव; टोळक्याकडून घरात शिरून जोडप्याला मारहाण

बजेटमध्ये भाजपच्या मंत्र्यांना १ लाख कोटींचा निधी देण्यात आला आहे. तर, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांना ८७ हजार कोटींचा निधी देण्यात आला आहे. तर, अर्थखातं राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे असल्यामुळे राष्ट्रवादीला भाजप आणि शिंदेसेनेपेक्षा अधिक निधी मिळाला आहे.

Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde
Dombivali News: RSSच्या शाखेवर कुणी केली दगडफेक? पोलिसांना मोठा पुरावा हाती लागला, ५ जण ताब्यात

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थखातं असल्यामुळे या विभागाला १,८४,२८६.६४ कोटी रूपये मिळाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पवारांनी अर्थ विभागाला २,४७,५७० कोटी रूपये अधिक दिले आहेत. तर, एकनाथ शिंदेकडील नगरविकासाचा १० हजार कोटींचा निधी कापला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील गृह विभागाला सर्वाधिक म्हणजेच ४४ हजार ५०६ कोटींचा निधी देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com