Shocking Crime: महाराष्ट्रात चाललंय काय? तुझी बायको एका रात्रीसाठी पाठव; टोळक्याकडून घरात शिरून जोडप्याला मारहाण

Crime against women in Titwala: जुन्या वादातून एका विवाहितेची छेड काढत तिला नग्न करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच तिच्या कुटुंबाचा छळ केला आहे.
Mumbai crime news
Mumbai crime newsSaam Tv
Published On

टिटवाळ्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जुन्या वादातून तरूणाच्या पत्नीची छेड काढण्यात आली आहे. यावेळी तिच्या नवऱ्याची आणि कुटुंबाला मारहाण करण्यात आली आहे. तसेच 'तुझ्या बायकोला एका रात्रीसाठी आमच्याकडे पाठव' अशी देखील मागणी आरोपीयांनी पतीकडे केलीय. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, पोलिसांनी केवळ एनसी दाखल केली आहे.

कल्याणनजीक टिटवाळा येथे बल्याणी परिसर आहे. या परिसरात पीडित पती पत्नी राहतात. पीडित दाम्पत्य आपल्या आईकडे जेवणासाठी गेले होते. याच दरम्यान काही लोक त्यांच्यासमोर आले. यातील एकाचा पतीसोबत जुना वाद होता . त्याने आधी पतीची खिल्ली उडवली. 'लग्न केले आहे का? तुझे लग्न करुन फायदा काय?

Mumbai crime news
Dombivali: RSSच्या वीर सावरकर शाखेवर दगडफेक, लहान मुले प्रशिक्षण घेत असताना झाला हल्ला

नंतर आरोपींनी त्याच्या पत्नीचा हात पकडला. नंतर तिला 'या व्यक्तीशी लग्न का केले, असा प्रश्न विचारला. यावेळी पतीनं पत्नीला वाचवण्याचा प्रयत्न केला. नंतर आरोपींनी तरूणाला बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. या संपूर्ण मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

Mumbai crime news
Beed Shirur News: ढाकणे पिता-पुत्राला होणार अटक? ॲट्रॉसिटी आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

२०-२५ जणांनी मिळून पती - पत्नीसह त्याच्या कुटुंबाला मारहाण करण्यास सुरूवात केली. टिटवाळा पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पण धक्कादायक बाब म्हणजे त्यांनी पीडितांची बाजू न घेता त्यांनी आरोपीयांची बाजू घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल न करता फक्त एनसी दाखल केली. याप्रकरणी आरोपींनी न्याय द्यावा अशी मागणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com