Vidhan Parishad Election:
Vidhan Parishad Election 2025Saam Tv

Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या एका जागेसाठी इच्छुकांची तोबा गर्दी; राष्ट्रवादीतील 100 हून अधिक नेत्यांचे अर्ज

Vidhan Parishad Election 2025: विधानपरिषदेतील ५ जागांसाठी मतदान होणार आहे. यापैकी एक जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला आली आहे.
Published on

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर झालीय. विधानपरिषदेसाठी २७ मार्चला मतदान होणार आहे. यात भाजपच्या वाट्याला तीन, राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी एक आणि शिवसेना शिंदे गटाच्या एका आमदारासाठी मतदान होणार आहे. एका जागा असली इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे. याचमुळे अजित पवारांची डोकेदुखी वाढलीय. राष्ट्रवादीच्या एका जागेसाठी १०० पेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केलेत.

या आमदारांच्या जागेसाठी होणार मतदान

विधानसभा निवडणुकीत आमश्या पडवी, प्रवीण दटके, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपिचंद पडळकर हे विधान परिषदेत आमदार होते. विधानसभेवर निवडून गेल्याने त्यांच्या जागा रिक्त आहेत. विधानसभेवर निवड झाल्यानंतर पाच आमदारांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे या पाच जागा रिक्त झाल्यात, या पाच जागांसाठी आता २७ मार्चला निवडणूक होणार आहे.

Vidhan Parishad Election:
Municipal Corporation Election: दिवाळीनंतरच उडणार महापालिका निवडणुकांचा बार; सर्वोच्च न्यायालयात ६ मे रोजी सुनावणी

मतदान कधी होणार?

विधानपरिषदेसाठी २७ मार्चला मतदान होणार आहे. तर १७ मार्च निवडणुकीसाठी फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे. तर विधानपरिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये इच्छुकांची चढाओढ लागलीय. आतापर्यंत सुमारे १०० जणांनी विनंती अर्ज केलेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे सध्या दोन विधानपरिषदेच्या जागा आहेत. त्यापैकी एक जागा राज्यपाल नियुक्त कोट्यातून पक्षाला मिळेल. तर दुसरी जागा विधानपरिषदेमध्ये आमदारांमधून निवडली जाणार आहे.

Vidhan Parishad Election:
Maharashtra Politics: आघाडीला तडा; महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून पुन्हा स्वबळाचा नारा

एका नावाची चर्चा जास्त

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक येत्या दोन दिवसात होणार आहे. या बैठकीत कोणाची विधानपरिषदेत वर्णी लावायची याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीआधी झिशान सिद्दीकी यांनी त्यांच्या वडिलांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर झिशान सिद्दिकी यांचे पुनर्वसन करण्यात येईल, त्यामुळे त्यांना विधानपरिषदेत पाठवलं जाण्याची शक्यता आहे. झिशान सिद्धिकी यांना विधानसभेत उमेदवारी देण्यात आली होती. मात्र झिशान सिद्दिकी यांचा पराभव झाला. यानंतर ते विधान परिषदेसाठी इच्छुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com