राज्यातील महायुतीतील अंतर्गत वाद आता उघडपणे समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांचा अघोरी पूजा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. विशेष म्हणजे, हा व्हिडिओ महायुतीतीलच मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला होता. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी आणि आमदार महेंद्र थोरवे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप करत थेट निशाणा साधला आहे.
महेंद्र दळवींकडून सुनील तटकरेंवर निशाणा
भरत गोगावले यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर टीका सुरू झाली होती. मात्र, आमदार महेंद्र दळवी यांनी मोठा दावा करत थेट सुनील तटकरेंवर प्रहार केला आहे. 'सुनील तटकरे यांच्या अनेक अघोरी विद्या लवकरच बाहेर काढू आणि त्याबाबत माझ्याकडे पुरावे आहेत', असं महेंद्र दळवींनी ठणकावून सांगितलं.
भरत गोगावले यांच्या व्हायरल झालेल्या अघोरी व्हिडिओवर बोलताना महेंद्र दळवी म्हणाले, 'भरत गोगावले यांचा रोजचा दिनक्रम आहे. ते दररोज आंघोळीनंतर कार्यकर्त्यांची भेट घेतात. मात्र, विरोधकांनी गोगावले यांनी अघोरी पूजा केली, असं चित्र उभं केलं', असं दळवी म्हणाले.
तसेच सुनील तटकरेंबाबत बोलताना दळवींनी गौप्यस्फोट केला, 'सुनील तटकेर हे निवडणुकीमध्ये कोणतं पद हवं असेल तर, भय्यूजी महाराज यांच्याकडे जातात. त्यांच्यांकडून अघोरी पूजा करून घेतात. त्यांची ही अघोरी विद्या वेळ आल्यावर बाहेर काढेन', असा थेट इशारा दळवींनी तटकरेंना दिला.
महेंद्र थोरवेंकडून सुनील तटकरेंकडून गंभीर आरोप
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे आणखी एक आमदार महेंद्र थोरवे यांनीही तटकरे कुटुंबावर गंभीर आरोप लावत आदिती तटकरेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागितला आहे.'रोहा तालुक्यातील दुरटोली गावाजवळील एका सरकारी जमिनीवर आधी शेतकऱ्यांचे नाव लावले. नंतर ती जमीन तटकरे यांनी विकत घेतली', असा आरोप आमदार महेंद्र थोरवे यांनी केला. याच मुद्यावर थोरवे यांनी आदिती तटकरे यांच्या मंत्रिपदाचाही राजीनामा मागितला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.