Shocking Crime: डॉक्टर पत्नीचा खरा चेहरा समोर, ३ कोटींच्या बंगल्यात प्रियकराच्या मदतीने पतीचा खून; कारण फक्त..

Woman Kills Husband With Lover’s Help: उत्तराखंडमधील कोटद्वार परिसरात डॉक्टर पत्नी आणि तिच्या प्रियकराने पतीचा खून केला. बंगला विक्रीवरून वाद झाला होता. मृतदेह जंगलात फेकला गेला. दोघे अटकेत.
Crime News
Crime News Saam Tv
Published On

उत्तराखंडमधील कोटद्वार परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका डॉक्टर पत्नीने आपल्या प्रियकरासोबत नवऱ्याची हत्या केली. नवरा ३ कोटींचा बंगला विकत असल्याने पत्नी नाराज होती. अखेर तिने प्रियकरासोबत कट रचून नवऱ्याला दारू पाजली, हत्या केली आणि मृतदेह जंगलात फेकून दिला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

रवींद्र कुमार (वय वर्ष ५६) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते मुरादाबाद येथील रहिवासी होते. रीना सिंधू (वय वर्ष ३६) असे आरोपी पत्नीचं तर, परितोष कुमार (वय वर्ष ३३) असे पत्नीच्या प्रियकाराचे नाव आहे. आरोपी प्रियकर बिजनौर जिल्ह्यातील थाना नगीना येथील सराई पुरानी गावचा रहिवासी आहे. रवींद्र कुमार यांचे मुरादबाद येथे रामगंगा विहारच्या पॉश कॉलनीत एक अलिशान बंगला आहे.

Crime News
Beed News: 'माहेरहून पैसे आण'; विवाहितेचा अतोनात छळ, विष पिऊन आयुष्य संपवलं; बीड हादरलं

हा बंगला रविंद्र कुमार यांना विकायचा होता. या घराची किंमत सुमारे ३ कोटी असल्याची माहिती आहे. ज्याचे दरमहा चांगले भाडे मिळत होते. रिना पतीने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात होती. या काळात तिची ओळख परितोष कुमारशी झाली. तो रीनाच्या क्लिनिकमध्ये पेशंट म्हणून आला होता. दोघांमध्ये जवळीक वाढली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले. त्यानंतर रीनाने परितोषसोबत पतीच्या हत्येचा कट रचला.

Crime News
Shocking: शारीरिक संबंध ठेवताना रूमचे पडदे लावायला विसरले; ५ स्टार हॉटेलमधला व्हिडिओ व्हायरल

रीनाने प्रथम पतीला दारू पाजली. नंतर त्याची हत्या केली. त्यानंतर दोघांनी मिळून रवींद्रला एसयूव्हीमधून कोटद्वारच्या जंगलात फेकून दिलं. दरम्यान, पोलिसांना जंगलात मृतदेह सापडल्यानंतर त्यांनी तपासाला सुरूवात केली. या हत्येमागे पत्नी आणि तिच्या प्रियकराचा हात असल्याची माहिती समोर आली. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com