shivsena and bjp  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी महायुतीतच हेवेदावे वाढले; अलिबागच्या जागेवरून शिंदे गट आणि भाजपमध्ये 'सुप्त' संघर्ष, कारण काय?

Vishal Gangurde

सचिन कदम, साम टीव्ही प्रतिनिधी

रायगड : विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर जाहीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीमध्येच उमेदवारीसाठी हेवेदावे, स्पर्धा वाढली आहे. कल्याणनंतर आता अलिबागमध्येही शिंदे गट आणि भाजपमध्ये सुप्त संघर्ष सुरु झाला आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग विधानसभा मतदारसंघावर शिंदे गट आणि भाजपनेही दावा केला आहे. त्यामुळे अलिबागच्या जागेचा तिढा कोण मिटवणार, याकडे आता लक्ष लागलं आहे.

अलिबाग विधानसभेवरून भाजपचे दिलीप भोईर आणि शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केणी यांच्‍यात वाकयुद्ध झालं आहे. रायगड जिल्‍ह्यातील अलिबागमध्ये शिंदे गट आणि भाजपमध्‍ये आरोप प्रत्‍यारोपांच्‍या फैरी सुरू आहेत. अलिबाग विधानसभेच्या जागेवरून भाजपचे दक्षिण रायगड जिल्‍हा उपाध्‍यक्ष दिलीप भोईर आणि शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केणी यांच्यामध्ये वाकयुद्ध सुरु झाले आहे.

भोईर यांनी राजा केणी यांच्यावर शासनाची खोटी बिल काढली, असे भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तर भोईर यांनी हे भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध केले तर राजीनामा देईन, असे उत्तर राजा केणी यांनी दिल आहे. भोईर यांनी आमदार की सोडा जिल्हा परिषदेला निवडून येऊन दाखवावं, असा इशाराच राजा केणी यांनी दिला आहे.

शिंदे गटाचे राजा केणी काय म्हणाले?

शिंदे गटाचे राजा केणी म्हणाले, 'अलिबागमध्ये दिलीप भोईर यांनी सोशल मीडियावर स्वत:ची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर उमेदवारीबाबत प्रसार सुरु केला आहे. त्यानंतर मी त्यांना हा प्रकार थांबवण्यास सांगितला. तसंच मी सांगतो की, मी कुठेही एक रुपयांचा खोटा बिल काढला असेल तर त्यांनी सिद्ध केला असेल. त्यानंतर मी माझ्या पक्षाच्या जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिला. त्यांनी सिद्ध नाही केल तर त्यांनी त्यांचा पदाचा राजीनामा द्यावा'.

'ते म्हणाले आम्हाला डिवचू नका. मी १० हजार माणसे गोळा करेल, अशी दादागिरीची भाषा वापरली. त्यामुळे त्यांना सांगून इच्छित आहे की, त्यांनी वेळ आणि तारीख सांगावी. मी यायला तयार आहे. ते १० हजार लोक गोळा करतील, तर मी अख्खा जिल्हा उभा करेल, असे केणी म्हणाले.

'भोईर हे आमदार व्हायला निघाले आहेत. त्यांना पक्ष वाढवण्याची स्वातंत्र्य आहे. ते दोनदा जिल्हापरिषदेला जिंकून आले. ते कसे निवडून आले, याचे आम्ही साक्षीदार आहोत. आता आमदारापेक्षा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येऊन दाखवावं, असा इशारा केणी यांनी दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: विधानसभेच्या मोर्चेबांधणीत मनसेची आघाडी! दसऱ्यानंतर राज ठाकरेंचा मेळावा; उमेदवारांची घोषणा करणार

Marathi News Live Updates : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून २ दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर

Raigad Crime : रायगड हादरलं! १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल होताच पोलीस पाटील फरार

Viral News: दिल्ली मेट्रोत चाललंय तरी काय? अश्लील डान्सनंतर आता रंगला पत्त्यांच्या डाव; VIDEO पाहून अनेकांचा संताप

Assembly Election 2024: राजकीय सभांचा डबल धमाका! PM मोदींची ठाण्यात तर राहुल गांधींची कोल्हापुरात 'तोफ' धडाडणार; वाचा सविस्तर..

SCROLL FOR NEXT