Maharashtra Cabinet ministry Saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : ...तोपर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहावेत, आमदारांची मागणी, शिवसेना नेत्याचं मोठं विधान

Gulabrao Patil on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदावर महायुतीमध्ये अद्याप रस्सीखेच असल्याच्या चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी शिवसेनेच्या आमदारांची मागणी असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. त्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आले.

Namdeo Kumbhar

Gulabrao Patil on Eknath Shinde News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री राहायला हवं, अशी आमची सर्वांची इच्छा होती, असे विधान शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी केले आहे. गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्याशिवाय महायुतीमध्ये मुख्यमंत्रि‍पदावरून तेढ आहे का? अशी राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अशी प्रत्येकाची इच्छा आहे. मुख्यमंत्री कार्यकाळात त्यांनी सर्वच घटकांची चोखपणे भूमिका बजावली. त्यामुळे त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा आहे. राजीनामा देताना एकनाथ शिंदे यांनी, भाजपचे केंद्रीय नेतृत्वा जो निर्णय घेतील ते मान्य असल्याचं सांगितलं. पण तरीही जनतेच्या मनात एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले. मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. एकनाथ शिंदे यांनी सरकारमध्ये सहाभागी व्हावे, त्यांनी गृहमंत्रिपद तरी घ्यावं, अशी सर्व आमदारांची इच्छा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं. पण त्यांनी भूमिका घेतली आहे, त्यामुळे आम्ही आता त्यावर काय बोलणार असे गुलाबराव पाटील म्हणाले.

संजय राऊतांच्या आरोपाला उत्तर, काय म्हणाले ?

संजय राऊत खालच्या थराचा माणूस आहे. त्यांनी आधी शिवसेना संपवली मग राष्ट्रवादी आणि आता काँग्रेस संपवली आहे. हा कोणाचाच नाही. हा नौटंकी आहे. फक्त एक्टिंग करतो. हा एकही आमदार पाडू शकला नाही. उद्धव ठाकरे यांना चुकीच्या माहिती दिल्या, जसा चिकनगुनीया तसा हा संजयगुनीया माणूस आहे, असा हल्लाबोल गुलाबराव पाटील यांनी राऊतांवर केला.

राष्ट्रवादी-शिवसेना यांच्यात कलह

राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या मंत्रिपदाची मागणी केली आहे, आमची मागणी शिंदे साहेब करत आहेत. आम्ही प्रमोद महाजन साहेबांच्या वेळीची युती टिकवून ठेवण्यासाठी लढलो. आम्ही ६ महिने फोन बंद केले . आम्ही त्यामुळे 100 जागा लढलो असतो आणि जास्त जागा जिंकलो असतो, असा टोला राष्ट्रवादीला लगावलाय. मी असे म्हटलं की कदाचित ते आले नसते तर आम्हाला जास्त जागा मिळाल्या असत्या आम्ही जास्त जिंकलो असतो, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: जुन्या रेल्वे डब्यांचा वापर रेल्वे कसा आणि कुठे करते? जाणून घ्या सर्व माहिती

Sabudana Thalipeeth Recipe : आषाढी एकादशीसाठी झटपट गरमा गरम साबुदाणा थालीपीठ रेसिपी

Neena Gupta Birthday: लग्न न करता झाली आई, मुलीसाठी केला संघर्ष; नीना गुप्ताने अशा प्रकारे मिळवले इंडस्ट्रीत हक्काचे स्थान

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Nashik Rain: नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर, रामकुंड परिसरात हुल्लडबाजांचा हैदोस|VIDEO

SCROLL FOR NEXT