Beed Crime Shirur Saam Tv
महाराष्ट्र

Beed Crime : आधी अपहरण केलं, मग अमानुष मारहाण; बीडमध्ये 'त्या' मायलेकासोबत काय घडलं?

Shirur Crime News : बीडच्या शिरूरमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जुन्या वादातून एका तरुणाचे त्याच्या आईसह अपहरण करण्यात आले. अपहरणानंतर त्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली.

Yash Shirke

योगेश काशिद, साम टीव्ही, प्रतिनिधी

जुन्या वादातून एका तरुणाला आणि त्याच्या वयस्कर आईला जबर मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी तरुण आणि त्याच्या आईचे अपहरण केले आणि त्यानंतर त्यांना मारहाण केली अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही घटना शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या शिरूर येथील घाटशील पारवगाव येथे जुन्या वादातून तरुण आणि त्याच्या आईला अमानुषपणे मारहाण करण्यात आली. सुरुवातीला दोघांचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर मारहाण केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. मारहाणीमुळे तरुणाच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्याचे पाहायला मिळते. या तरुणाचे नाव कृष्णा दादासाहेब घोडके असे म्हटले जात आहे.

beed crime photos

हा प्रकार झाल्यानंतर २४ तासांनी बीडच्या शिरूर पोलीस ठाण्यामध्ये कृष्णा दादासाहेब घोडके याच्या तक्रारीवरुन ६ आरोपींच्या विरोधात कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले आहे अशी माहिती शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश ढोक्रड यांनी दिली आहे.

आरोपींचा फिर्यादी तरुण आणि त्याच्या आईसोबत जुना वाद होता. त्या वादातून आरोपीने मायलेकाचे अपहरण केले. त्यांना अज्ञात स्थळी नेऊन जबर मारहाण केली. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी विशेष पथक तयार करुन आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. या प्रकारामुळे शिरूर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

Maharashtra Politics: मोठी बातमी! रायगडमध्ये भाजपच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Elephanta Caves : 'घारापुरी' लेणीला 'एलिफंटा' हे नाव कसं पडलं? कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

उंची कमी असल्यास कपड्यांची निवड कशी करावी? जाणून घ्या 5 स्मार्ट स्टायलिंग टिप्स

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मूळ वेतनात होणार ५१००० रुपयांची वाढ? कसं असेल कॅलक्युलेशन?

SCROLL FOR NEXT