Shirur Accident Saam Tv
महाराष्ट्र

Shirur Accident: तो प्रवास ठरला अखेरचा! कार-कंटेनरचा भीषण अपघात, बाप-लेकीसह तिघांचा मृत्यू

Father And Daughter Died In Accident: शिरूरमध्ये कंटेनर आणि कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये बाप-लेकीसह तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

Priya More

रोहिदास गाडगे, शिरूर

पुणे जिल्ह्यातल्या शिरूरमध्ये भीषण अपघाताची घटना घडली. कार-कंटेनरच्या भीषण अपघातामध्ये बाप-लेकीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिरुर तालुक्यातील न्हावरा - तळेगाव रस्त्यावरील न्हावरा गावाजळव हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये कारचा चक्काचूर झाला. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताचा तपास पोलिस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, न्हावरा येथे कंटेनर आणि कारचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात कारचा चक्काचूर झाल्याने कारमधून प्रवास करणाऱ्या बाप-लेकीसह तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी झाले आहे. समोरून भरधाव येणाऱ्या कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटला त्यामुळे हा अपघात झाला. भरधाव कंटेनरने कारला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताचा तपास शिरूर पोलिस करत आहेत.

कैलास कृष्णाजी गायकवाड, गौरी कैलास गायकवाड आणि गणेश महादेव निर्लेकर अशी अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. तर कैलास गायकवाड यांची दुसरी मुलगी दुर्गा ही अपघातामध्ये गंभीर जखमी झाली आहे. दुर्गावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. कैलास यांचा मुलींसोबतचा प्रवास अखेरचा ठरला. बाप लेकीचा मृत्यूमुळे न्हावरा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अयोध्येतील राममंदिरावर भगवा ध्वज, काय आहे वैशिष्ट्यं ?

Local Body Election : महाराष्ट्रात घराणेशाहीचा सिक्सर,शिंदेसेनेत एकाच घरात 6 उमेदवार

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

SCROLL FOR NEXT