भोस्ते (खेड) : मुंबई- गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सिमेंटच्या बकलर टॅंकरने कारला जोरदार धडक दिली. त्यानंतर बकलर याच ठिकाणी नादुरुस्त असलेल्या ट्रकवर आदळला आणि ट्रक जवळपास २०० फुट खाली खोल दरीत कोसळला. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नसून पाचजण जखमी झाले आहेत.
मुंबई- गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात हा विचित्र अपघात झाला आहे. घाट रस्ता असल्याने याठिकाणी अवजड वाहने धीम्या गतीने जात असतात. अशातच हा अपघात घडला आहे. गोव्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सिमेंटच्या बकलर टँकरने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोर उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन धडकला. यामुळे ट्रक थेट दरीत जाऊन कोसळला.
कारमधील पाचजण जखमी
सिमेंट बकलर देखील खोल दरीत कोसळला. या अपघातात कारमधील पाच प्रवासी जखमी झाले आहेत. तर बकलरमधील चालकासह क्लीनर देखील जखमी झाला आहे. असे एकूण सातजण जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकरणी जीवितहानी झाली नाही. तर दोन्ही ट्रक दरीत कोसळल्याने ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच कारचे देखील यात नुकसान झाले आहे.
चार दिवसात चौथा अपघात
दरम्यान मुंबई- गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील या विचित्र अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक मंदावली आहे. भोस्ते घाट हा अपघातांना कारणीभूत ठरतो आहे. या घाटात वारंवार अपघात होत आहे. त्यामुळे हा घाट धोकादायक बनला आहे. गेल्या चार दिवसातील हा चौथा भीषण अपघात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.