Shahapur Crime : चोरट्यांकडून गुरांना गुंगीचे इंजेक्शन; जनावरांची प्रकृती चिंताजनक, एका गायीचा मृत्यू

Shahapur News : मोकाट जनावरे किंवा शेतकऱ्यांची जनावरे चोरून नेल्याच्या घटनांमध्ये मागील काही दिवसांपासुन वाढ झाली आहे. जनावरे चोरी करणारी एक टोळी सक्रिय झाली असून गुंगीचे इंजेक्शन देऊन गाडीत नेत आहेत
Shahapur Crime
Shahapur CrimeSaam tv
Published On

फैय्याज शेख 
शहापूर
: सध्या जनावरे चोरणारी टोळी शहापूर तालुक्यात सक्रिय झालेली आहे. तालुक्यातील अनेक भागातून मोकाट जनावरांना गुंगीचे इंजेक्शन देऊन गाडीत घेऊन पसार होत आहे. मात्र गुंगीचे औषधी दिले जात असल्याने जनावरांची प्रकृती खराब होत आहे. तर या प्रकारामुळे एका गायीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे. 

मोकाट जनावरे किंवा शेतकऱ्यांची जनावरे चोरून नेल्याच्या घटनांमध्ये मागील काही दिवसांपासुन वाढ झाली आहे. जनावरे चोरी करणारी एक टोळी सक्रिय झाली असून जनावरांना गुंगीचे इंजेक्शन देऊन गाडीत नेत आहेत. दरम्यान शहापूर तालुक्यातील डोळखांब गावाच्या बाजारपेठच्या बाजूला उघड्या मैदानात आठ ते दहा जनावरांना गुंगीचे इंजेक्शन दिल्याचे समोर आले आहे. या जनावरांना गुंगी अल्याने ते चक्कर आल्यासारखे गोलगोल फिरत असून खाली पाडतात.  

Shahapur Crime
Jalgaon Accident : जळगावात थरार; उड्डाणपुलावर ट्रकचे ब्रेक फेल, रिव्हर्स आलेल्या ट्रकने तीन रिक्षांसह दुचाकींना धडक, एकाचा मृत्यू तिघे गंभीर

एका जनावराचा मृत्यू 

रात्रीच्या सुमारास डोळखांब गावात आठ ते दहा जनावरांना गुरे चोरणारी टोळीने गुंगीचे इंजेक्शन दिल्याने त्यांना हे जनावरे चोरता आली नाही. आज सकाळपासून हे जनावरे गुंगीचे इंजेक्शनमुळे भोवळ आल्यासारखे फिरत खाली पडत आहेत. त्यातच उन्हाचा तडाखा असल्याने पाण्याअभावी एका गायीचा मृत्यू देखील झाला आहे. गावकऱ्यांनी पशुसंवर्धन विभागाला यांची माहिती दिली आहे. सध्या ही जनावरे शेवटची घटका मोजत आहेत.

Shahapur Crime
Tomato Price : ट्रान्सपोर्टसाठी खिशातून पैसे; दर घसरल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांपुढे अडचण

घटना रोखण्याचा आव्हान 

दरम्यान असे प्रकार सातत्याने होत असल्याचे समोर आले आहे. परिसरात टोळी सक्रिय झाली असून या टोळीकडून चोरीच्या घटना वाढल्याने पशुपालकांमध्ये देखील चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच टोळीकडून सातत्याने होत असलेले असले प्रकार रोखण्यासाठी पोलीस प्रशासन व पशुसंवर्धन विभागासमोर आव्हान उभे राहिले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com