Jalgaon Accident : जळगावात थरार; उड्डाणपुलावर ट्रकचे ब्रेक फेल, रिव्हर्स आलेल्या ट्रकने तीन रिक्षांसह दुचाकींना धडक, एकाचा मृत्यू तिघे गंभीर

Jalgaon News : जळगाव शहरातील शिवाजीनगरजवळील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलावर हा अपघाताचा थरार घडला आहे. दरम्यान मालधक्क्यावरून सिमेंटच्या गोण्या भरून ट्रक उड्डाणपुलावरून जात होता
Jalgaon Accident
Jalgaon AccidentSaam tv
Published On

जळगाव : जळगाव शहरातील वर्दळ असलेल्या उड्डाणपुलावर भीषण अपघाताचा थरार घडला आहे. सिमेंट वाहतूक करणारा ट्रक उड्डाणपुलावरून जाताना अचानक ब्रेक फेल झाले. यामुळे ट्रक उतारावरून रिव्हर्स आल्याने अपघात घडला आहे. यात मागे उभ्या असलेल्या तीन प्रवासी रिक्षांसह पाच दुचाकींना धडक देत चिरडले. यात एकाचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

जळगाव शहरातील शिवाजीनगरजवळील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलावर हा अपघाताचा थरार घडला आहे. दरम्यान सुरत रेल्वेगेटजवळील मालधक्क्यावरून सिमेंटच्या गोण्या भरून ट्रक उड्डाणपुलावरून जात होता. उड्डाणपुलावरील काही अंतर पार केल्यानंतर अचानक ट्रकचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे ट्रक उतारावरून मागच्या बाजूने रिव्हर्स येऊ लागला. ट्रक हा पूर्णपणे लोड असल्याने ट्रक वेगाने रिव्हर्स येऊ लागल्याने चालकाचे यावरील नियंत्रण सुटले होते. 

Jalgaon Accident
Solapur Accident : कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात; महिलेचा जागीच मृत्यू तर ५ जण गंभीर, अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद


तिघे जखमी, एकाचा मृत्यू 
या घटनेत राधाकृष्ण नगरात राहणारे सुरेश ओस्वाल (वय ५०) हे घरी जात असताना त्यांना रिव्हर्स येणाऱ्या ट्रकने धडक दिली. यामध्ये ओस्वाल यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने ते जखमी झाले. तसेच उड्डाणपुलाशेजारी उभे असलेले रुपेश गोपाल चौधरी (वय ४३, रा. वरणगाव, ता. भुसावळ), आशा बानो यांच्यासह अन्य दोघे जखमी असून, त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील सुरेश ओस्वाल यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. 

Jalgaon Accident
Bribe Case : २५ हजार रुपये घेताना ग्रामविकास अधिकारी ताब्यात; बिल मंजुरीसाठी घेतली लाच

रिक्षा, दुचाकींचा चेंदामेंदा 
ट्रकने शिवाजीनगर उड्डाणपुलाशेजारी असलेल्या रिक्षा थांब्यावर उभ्या असलेल्या तीन रिक्षांसह तेथील चार ते पाच दुचाकींना चिरडले. यात रिक्षांसह दुचाकी या पूर्णपणे दाबल्या गेल्या आहेत. अपघातात नुकसान झालेल्या रिक्षाचालकांसह दुचाकीस्वारांनी ट्रकच्या मालकाने नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी. या मागणीसाठी त्यांनी अपघातस्थळी ठिय्या मांडला होता. यामुळे वाहतूक खोळंबली होती. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com