अंबरनाथ : उल्हासनगरमध्ये असलेल्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयातील वीज पुरवठा मागील तीन तासांपासून खंडित झाला आहे. यामुळे रुग्णालय अंधारात आहे. रुग्णालयातील जवळपास सर्वच वॉर्डातील वीज पुरवठा सुरु नसल्यामुळे येथे दाखल रुग्ण त्रस्त झाले आहेत. तर रुग्णालयात असलेले जनरेटरचा बॅकअप सुद्धा मिळू शकत नसल्यामुळे ऑपरेशन्स आणि प्रसूती देखील थांबविण्यात आल्या आहेत.
उल्हासनगरमध्ये महावितरण कडून शुक्रवारी शटडाऊन घेण्यात येत असतो. त्यानुसार आज देखील शटडाऊन करण्यात आला होता. यामुळे या शटडाऊनच्या काळात रुग्णालयातील वीज पुरवठा खंडित झाला होता. दरम्यान शटडाउनच्या कालावधीत जनरेटरच्या माध्यमातून रुग्णालयात वीज पुरवठा सुरू राहतो. मात्र आज रुग्णालयात दुरुस्तीचे काम सुरु असल्याचे जनरेटरचा बॅकअप देखील घेता येणे शक्य झाले नाही.
आणखी चार तास वीज राहणार खंडित
शटडाऊनच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रुग्णालयातील इलेक्ट्रिक पॅनल बदलण्याचं काम हाती घेण्यात आले होते. यामुळे जनरेटर देखील बंद ठेवण्यात आले आहे. परिणामी संपूर्ण हॉस्पिटलचा वीज पुरवठा मागील तीन तासांपासून खंडित झाला आहे. पुढील तीन ते चार तास वीज पुरवठा सुरू होणार नसल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे संपूर्ण रुग्णालयात अंधार पसरला असून वार्डातले लाईट पंखे बंद असल्यामुळे रुग्ण त्रस्त झाले आहेत.
रुग्णालयातील शस्त्रक्रिया रखडल्या
सुदैवानं आयसीयूमध्ये बॅकअप असल्यामुळे आयसीयूमधील मशिनरी सुरू आहेत. मात्र रुग्णालयात होणारे ऑपरेशन्स आणि प्रसुती लाईट नसल्यामुळे रखडल्या आहेत. दरम्यान या कालावधीत एखादे इमर्जन्सी ऑपरेशन करायचं असेल, तर आम्ही रुग्णाला उल्हासनगरमधीलच दुसऱ्या शासकीय रुग्णालयात घेऊन जातो आणि तिथे ऑपरेशन करतो, अशी माहिती रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोहर बनसोडे यांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.