Sai Baba Mandir Trust News Saamtv
महाराष्ट्र

Sai Baba Temple: शिर्डीत साई भक्तांची फसवणूक! बनावट पावतीचा प्रकार उघडकीस; कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

Sai Baba Sansthan News: देणगी कक्षात कंत्राटी कामावर असलेल्या दशरथ चासकर या कर्मचाऱ्याने अपहार केल्याचा प्रकार चौकशीत समोर आला आहे.

Gangappa Pujari

सचिन बनसोडे, प्रतिनिधी

Shirdi Sai Baba Temple News:

साईसंस्थानच्या देणगी कक्षात देणगीदारांनी दिलेल्या देणगीपोटी बनावट पावती देऊन एकाचवेळी साईसंस्थान आणि देणगीदारांची फसवणूक करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. साईबाबा संस्थानची फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यावर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी साईबाबा (Sai baba Sansthan) संस्थानला एक निनावी पत्र प्राप्त झाले होते. या पत्रात देणगी कक्षात कामावर असलेला एक कंत्राटी कर्मचारी देणगीदारांना दिलेल्या रकमेच्या दोन भाग करून पावत्या देतोय आणि त्यातील एक बनावट असते. बनावट पावतीची संस्थानाकडे नोंद होत नाही. त्या रकमेचा अपहार केला जातो, असे नमूद केले होते.

साईबाबा संस्थानने याबाबत चौकशी केली असता या प्रकरणात तथ्य असल्याचे समोर आले. देणगी कक्षात कंत्राटी कामावर असलेल्या दशरथ चासकर या कर्मचाऱ्याने अपहार केल्याचा प्रकार चौकशीत उघड झाला.

या प्रकरणी साईबाबा संस्थानचे प्रभारी लेखा अधिकारी कैलास खराडे यांच्या फिर्यादीवरून कंत्राटी कर्मचारी दशरथ चासकर याच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान आरोपी कर्मचारी चासकर याने आतापर्यंत किती लोकांना बनावट पावत्या दिल्या? तसेच त्याला या गुन्ह्यात आणखी कुणाची साथ आहे का? याबात शिर्डी पोलीस अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha News : नोटांचे स्क्रॅप भरून जाणाऱ्या ट्रकला आग; कांढळी ते बरबडी रस्त्यावरील घटना

Success Story: कधी-काळी एका खोलीत राहून काढले दिवस, आज आहेत शहरातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, पाहा काय आहे त्यांचा बिझनेस?

Maharashtra Politics: क्लिनिक चालवणाऱ्याकडे कोट्यवधीची प्रॉपर्टी कुठून आली? शिंदेंच्या आमदाराला सुषमा अंधारेंचा सवाल

Maharashtra News Live Updates: शिवसेना ठाकरे गटाच्या युवा सेनेचा जतमध्ये भाजपला पाठिंबा!

Girish Mahajan : कोपरगावमध्ये काळे- कोल्हेंचा वाद मिटणार, लवकरच एकाच मंचावर दिसतील; मंत्री गिरीश महाजन

SCROLL FOR NEXT