अक्षय बडवे
पुणे : बारा दिवसात २० लाख रुपयांचे ५ कोटी रुपये करून देतो. असे सांगून पाण्याच्या टाकीत पैसे टाकायाला सांगितले. यानंतर रूममध्ये धूर करून पुण्यातील महिलेला २० लाख रुपयांना गंडा (Fraud) घातल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील (Pune) मध्यवर्ती असलेल्या नारायण पेठेत ही घटना घडली आहे. (Latest marathi News)
पुणे शहरातील ४१ वर्षीय महिलेची विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून तन्वीर पाटील, शिवम गुरुजी, सुनील राठोड, आनंद स्वामी अशा ४ जणांवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीचे व्यावसायिक भागीदार यांच्या प्लॉटच्या व्यवहारा निमित्त दोन (Crime News) महिन्यांपूर्वी तनवीर पाटील यांच्यासोबत ओळख झाली होती. पाटील येणे इतरांशी संगणमत करून तिघांना वीस लाख रुपयांचे पाच कोटी रुपये करून देतो असे आमिष दाखवले. या भूलथापाला बळी पडत या तिघांनी वीस लाख रुपये जमवले.
दरम्यान १३ सप्टेंबर रोजी २०० लिटरच्या बॅरेलमध्ये वीस लाख रुपये टाकण्यास सांगितले. त्यानंतर त्या रूमची लाईट बंद करून त्या ठिकाणी आरोपींनी धूर केला. फिर्यादीस ते हरिद्वार येथे जाऊन पूजा करून आल्यानंतर या वीस लाख रुपयांचे बारा दिवसात पाच कोटी होती असे सांगून हे चारही जण वीस लाख रुपये घेऊन निघून गेले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी पोलीस ठाणे गाठले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.