PMC Scholarship 2023: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; १५ कोटींच्या शिष्यवृत्तीसाठी 'या' तारखेपासून करता येणार अर्ज

Scholarship News: यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्विकारण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
PMC Scholarship 2023
PMC Scholarship 2023Saam Tv
Published On

10th 12th Students Scholarship:

इयत्ता १०वी आणि १२वीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी महापालिकेतर्फे शिष्यवृत्ती दिली जाते. ज्या विद्यार्थ्यांना ८० पेक्षा जास्त टक्के मिळाले आहेत त्या विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येतो. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्विकारण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

PMC Scholarship 2023
Wagh Nakh Politics: वाघनखांवरून राजकारण तापलं; नीतेश राणेंची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका

'या' तारखेपासून अर्ज स्विकारणार

महापालिकेच्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना ९ ऑक्टोबरपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. याची अंतिम दिनांक डिसेंबर अखेरपर्यंतची आहे. लोकसभेची आचारसंहिता सुरू होण्याआधी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या समाज विकास विभागातर्फे ही शिष्यवृत्ती दिली जाते. यामध्ये इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसाह्य योजनेअंतर्गत १५ हजार रुपये दिले जातात. तर इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शैक्षणिक अर्थसाह्य योजनेतून २५ हजार रुपये दिले जातात.

१५ कोटी पेक्षा जास्त तरतूद

दरवर्षी या योजनेतून जवळपास १० ते १२ हजार विद्यार्थी याचा लाभ घेतात. यंदाच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी १५ कोटी पेक्षा जास्त तरतूद देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी यामुळे मदत होते.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अर्ज केल्यानंतर अंतिम दिनांक संपल्यावर या सर्व अर्जांची तपासणी केली जाते. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यासाठी ३ ते ४ महिन्यांचा कालावधी लागतो.

PMC Scholarship 2023
School Students: शाळेच्या बकांचा ढोल अन् कंपास पेटीचा ततड-ततड ताशा; विद्यार्थ्यांचा अफलातून व्हिडीओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com