Shinde Sena workers allegedly assault residents during an election campaign in Dahisar West, Mumbai. Saam Tv
महाराष्ट्र

महाराष्ट्र की बिहार? घरात प्रचारास विरोध केल्याने शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची हाणामारी

Dahisar West Door To Door Campaign Violence Video Viral: मुंबईच्या दहिसर पश्चिममध्ये घरात प्रचारास विरोध केल्याने शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी दोन नागरिकांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली.

Omkar Sonawane

  • • दहिसर पश्चिममध्ये निवडणूक प्रचारादरम्यान हिंसाचार
    • घरात प्रचारास विरोध केल्याने नागरिकांना मारहाण
    • शिंदे गटाच्या 8 ते 10 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल
    • व्हायरल व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
    • निवडणूक काळात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला उधाण आले असताना दहिसर पश्चिम भागात शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाणीमुळे खळबळ उडाली आहे. घरात प्रचार करण्यास विरोध केला म्हणून दोन नागरिकांना बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना काल संध्याकाळी दहिसर प्रभाग क्रमांक 1 मध्ये घडली. ही घटना शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार रेखा राम यादव यांच्या प्रचारादरम्यान घडली असून, दहिसर पश्चिम येथील विठ्ठलवाडी सोसायटी परिसरात प्रचार फेरी सुरू असताना हा प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाचे 8 ते 10 कार्यकर्ते प्रचार करत एका घरात गेले असता त्या घरातील नागरिकांनी घरात प्रचार नको, असा विरोध केला. याचाच राग आल्याने प्रचार करणारे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी त्या घरातील दोन व्यक्तींना लाथा-बुक्क्यांनी तसेच पक्षाच्या झेंड्यांनी बेदम मारहाण केली.

या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, त्यामध्ये कार्यकर्त्यांची दादागिरी आणि मारहाण स्पष्टपणे दिसून येत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात तसेच स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणी मध्यरात्री MHB पोलीस स्टेशनमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या 8 ते 10 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी आरोपींची धरपकड सुरू केली आहे.

दरम्यान, निवडणूक प्रचाराच्या काळातच अशा प्रकारची गुंडगिरी समोर आल्यामुळे दहिसर परिसरात मोठा राजकीय तणाव निर्माण झाला आहे. शांततापूर्ण प्रचाराची अपेक्षा असताना कार्यकर्त्यांच्या हिंसक वर्तनामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र आहे.

निवडून येण्यापूर्वीच जर अशी दादागिरी असेल, तर निवडून आल्यानंतर काय होणार?” असा सवाल आता दहिसरमधील स्थानिक नागरिक विचारू लागले आहेत. या घटनेनंतर “दहिसर की बिहार?” असा संतप्त सवाल सोशल मीडियावरही उपस्थित केला जात असून, मुंबईसारख्या महानगरात निवडणूक प्रचाराच्या नावाखाली होणाऱ्या गुंडगिरीवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Tourism : हजारो वर्षांचा इतिहास दडलाय 'या' किल्ल्यात, नाशिकमध्ये घ्या ट्रेकिंगचा अनोखा अनुभव

Blocked arteries: हृदयाच्या धमन्या ब्लॉक झाल्यावर हातामध्ये दिसतात ही लक्षणं; शरीरातील बदल वेळीच ओळखा

Shocking: बंद कारमध्ये आढळले दोघांचे मृतदेह अन् दारू, दार उघडताच पोलिसही चक्रावले; परिसरात खळबळ

Maharashtra Live News Update : कोल्हापूरमध्ये कमर्शियल गॅस पुरवठा तात्पुरता बंद

१०,२०,५० च्या नोटा ATM मध्ये का नाहीत? देशात चलनाचा तुटवडाय? वाचा नेमकं सत्य

SCROLL FOR NEXT