बिनविरोधला जोरदार विरोध, बिनविरोध नगरसेवकांचं पद जाणार?

Maharashtra Municipal Elections: नगरपालिकेपाठोपाठ महापालिका निवडणुकीतही घाऊक प्रमाणात सुरु असलेल्या बिनविरोध निवडीला आता जोरदार विरोध सुरु झालाय.. त्यामुळं बिनविरोध नगरसेवकांचं पद जाण्याची शक्यता आहे... ते नेमकं कसं.. आणि मनसे आणि ठाकरेसेनेनं बिनविरोध निवड झालेल्यांचं कसं टेन्शन वाढवलंय..
Sena and MNS leaders addressing the media over the controversy surrounding unopposed corporator elections in Maharashtra.
Sena and MNS leaders addressing the media over the controversy surrounding unopposed corporator elections in Maharashtra.Saam Tv
Published On

राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीत महायुतीच्या तब्बल 70 जागा बिनविरोध निवडून आल्या... मात्र याच बिनविरोध जागा वादाच्या भोवऱ्यात सापडल्यात... कारण विरोधी उमेदवारांना धमकावून अर्ज मागे घेण्यास भाग पाडल्याचा आरोप करत मनसेनं बिनविरोध निवडीला स्थगिती देण्याची मागणी केलीय...

ठाण्यात ठाकरेसेना आणि मनसेच्या उमेदवारांना पोलीसच शिंदेंच्या बंगल्यावर नेऊन धमकावत असल्याचा आरोपच राऊतांनी केलाय.. एवढंच नाही तर राऊतांनी थेट शिंदेंना हिंमत असेल तर समोर येऊन लढा, असं आव्हान दिलंय.. या वादात भाजपनं उद्धव ठाकरेंनाही ओढलंय..

बिनविरोधचा वाद तापलेला असतानाच त्यात कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंनी उडी घेतलीय.. मनसेनं दाखल केलेल्या याचिकेवर मतदान होण्याआधीच सुनावणी घेण्याची मागणी सरोदेंनी केलीय... खरं तर राज्यातील 29 महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाआधीच महायुतीचे घाऊक प्रमाणात बिनविरोध नगरसेवक निवडून आलेत.. पाहूयात कोणत्या पक्षाचे किती उमेदवार बिनविरोध निवडून आलेत..

भाजप- 44

शिंदेसेना- 22

राष्ट्रवादी (AP)- 2

इस्लामिक पार्टी- 1

अपक्ष- 1

विरोधकांच्या मागणीनंतर आता निवडणूक आयोगानं बिनविरोध निवडीच्या चौकशीचे आदेश दिलेत तसंच अहवाल आल्याशिवाय निकाल जाहीर करू नये असं स्पष्टही केलं आहे. तर हा वाद कोर्टात गेल्यामुळे बिनविरोध विरुद्ध नोटा असा सामना रंगणार का? यावर लोकशाहीचं भवितव्य अवलंबून असणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com