Sindhudurg chipi airport saam tv
महाराष्ट्र

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाला 'बॅ. नाथ पै' नाव देण्यात येणार; शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा निर्णय

चिपी विमानतळास बॅ. नाथ पै विमानतळ असे नाव देणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

रश्मी पुराणिक

Sindhudurg chipi airport News : सिंधुदुर्गातील (Sindhudurg) चिपी विमानतळाचे उद्घाटन नागरिकांना तब्बल २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर करायला मिळाला. चिपी विमानतळ (Airport) सुरू झाल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रर्यटनाला चालना मिळाली आहे. याच विमानतळास बॅ. नाथ पै विमानतळ असे नाव देणार आहे, असा निर्णय शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

शिंदे सरकारची मंगळवारी २७ सप्टेंबर २०२२ रोजी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत चिपी विमानतळाचे नामकरण, पोलीस भरती, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अशा विविध विषयांवर निर्णय घेण्यात आले. तसेच चिपी विमानतळास बॅ. नाथ पै विमानतळ असे नाव देण्यात येणार आहे. तसेच पोलीस भरती करण्याबाबत देखील निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय

• राज्यात फोर्टीफाईड तांदळाचे दोन टप्प्यात वितरण करणार.

(अन्न व नागरी पुरवठा विभाग)

• राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरीत महाराष्ट्र या तीनही विकास मंडळांचे पुनर्गठन होणार. (नियोजन विभाग)

• नगर विकास विभागाच्या प्रशासकीय कामकाजासाठी व राज्य शहर नियोजन संस्थेकरिता पायाभूत सोयी सुविधा निर्माण करणारी योजना.

(नगर विकास विभाग)

• पोलीस शिपाई संवर्गातील २०२१ मधील सर्व रिक्त पदे भरण्यासाठी पदभरती निर्बंधामधून सूट. एकूण वीस हजार पदे भरणार

(गृह विभाग)

• इतर मागास प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतीगृहे सुरु करणार.

(इतर मागास बहुजन कल्याण विभाग)

• इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ आता ५० विद्यार्थ्यांना मिळणार.

(इतर मागास बहुजन कल्याण विभाग)

• उच्च शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी सुधारित शिष्यवृत्ती योजना राबविणार. शिष्यवृत्तीची रक्कम ५० हजारापर्यंत वाढविली.

(अल्पसंख्यांक विकास विभाग)

• वन विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांचा वणवा, प्राणी हल्ला, तस्कर-शिकारी यांच्या हल्ल्यात, वन्य प्राण्यांचा बचाव करतांना मृत्यू झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास वारसांना लाभ देणार.

(वन विभाग)

• राज्यातील शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेद महाविद्यालयातील पूर्ण ग्रंथपाल, शारिरीक शिक्षण निर्देशकांना सातवा वेतन आयोग लागू.

(वैद्यकीय शिक्षण विभाग)

• दुय्यम न्यायालयातील न्यायीक अधिकाऱ्यांना दुसऱ्या राष्ट्रीय न्यायीक वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार सुधारित वेतन लागू करण्याचा निर्णय

(विधि व न्याय विभाग)

• महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०२१ मागे घेण्याचा निर्णय.

(उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

• महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम सुधारणाचे विधेयक मागे घेणार. दुरुस्तीसह पुन्हा लागू करणार

(उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

• एअर इंडियाकडून एअर इंडिया इंजिनीअरींग सर्व्हीसेस लिमिटेड या कंपनीस हस्तांतर होणाऱ्या ५० एकर जमिनीच्या मुल्यावरील मुद्रांक शुल्क माफ.

(महसूल विभाग)

• सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळास बॅ.नाथ पै विमानतळ असे नाव देणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hunger Causes : असा कोणता आजार आहे ज्यात प्रचंड भूक लागते?

Jalna Crime : मुलीच्या छेडखानीला विरोध करणाऱ्या पित्याला बेदम मारहाण; जालन्यातील धक्कादायक घटना

Vande Bharat Updates : आता वंदे भारतने अयोध्याला जा, २७ ऑगस्टपासून सुरू होणार एक्सप्रेस, वाचा रूट अन् तिकिट

Politics: मनसे अन् शिवसेना युतीवर खासदाराचं सूचक विधान; विजयी मेळाव्याबाबत नेमकं काय म्हणाले?

Courtroom Drama Series: 'जॉली एलएलबी' सारखीच मनोरंजक आहेत 'या' कोर्टरूम ड्रामा सिरीज, या विकेंडला करा बिंज वॉच

SCROLL FOR NEXT