Sanjay Raut Latest News
Sanjay Raut Latest NewsSaam TV

Sanjay Raut: संजय राऊतांच्या कोठडीत वाढ; जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली

पत्राचाळ आर्थिक घोटाळा प्रकरणात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचा आर्थर रोड कारागृहामधील मुक्काम वाढला.
Published on

मुंबई : पत्राचाळ आर्थिक घोटाळा प्रकरणात शिवसेना नेते खासदार संजय राऊत (sanjay raut) यांचा आर्थर रोड कारागृहामधील मुक्काम वाढला आहे. संजय राऊतांच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी झाली.

या सुनावणी दरम्यान राऊतांना दिलासा मिळाला नसून न्यायालयाने जामीन अर्जावरील सुनावणी १० ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे यंदाच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यालाही राऊत उपस्थित राहू शकणार नाहीत.

पाहा व्हिडीओ -

राऊतांना गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने जून महिन्यात अटक केली होती. त्यानंतर राऊत यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तर जामीन मिळावा या करता राऊतांनी न्यायालयाकडे अर्ज केला होता. या अर्जावरील सुनावणीसाठी राऊतांना आज PMLA न्यायालयात हजर केले यावेळी ईडीने युक्तिवाद करण्यासाठी पुढची तारीख मागितली. त्यानुसार न्यायालयाने आता १० ऑक्टोंबरपर्यंत सुनावणी पुढे ढकलली आहे. त्यामुळे १० तारखेपर्यंत राऊतांचा तुरुंगातला मुक्काम वाढला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com