Ahilyanagar road accident 
महाराष्ट्र

दिवाळीच्या खरेदीला निघाले, रस्त्यातच ट्रकने चिरडले; तिघांचा मृत्यू, दुचाकीचा चेंदामेंदा; अहिल्यानगरमध्ये हळहळ

Ahilyanagar road accident : दिवाळीच्या खरेदीसाठी शेवगावच्या दिशेने निघालेल्या खानपूर येथील तीन तरुणांचा अहिल्यानगरमध्ये भीषण अपघातात मृत्यू झाला. शेवगाव-पैठण रस्त्यावरील घोटण गावाजवळ भरधाव ऊसाच्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. या दुर्घटनेमुळे खानपूर गावावर शोककळा पसरली आहे.

Namdeo Kumbhar

सुशिल थोरात

Ahilyanagar road accident Death Toll : दिवाळीच्या सणाचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तीन तरुणांवर काळाने घाला घातल्याची मन हेलावून टाकणारी दुर्घटना अहिल्यानगरमध्ये घडली आहे. जिल्ह्यातील शेवगाव-पैठण रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ऊसाच्या भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे खानपूर गावावर आणि संपूर्ण परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खानपूर येथील तीन तरुण दिवाळीच्या खरेदीसाठी आपल्या दुचाकीवरून शेवगावच्या दिशेने निघाले होते. ते घोटण गावाजवळ आले असता, एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव उसाच्या ट्रकचालकाचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटले. या अनियंत्रित ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की,तिघांचा जागीच मृत्यू झाला.

मृत तरुणांची नावे:

या अपघातामध्ये प्राण गमावलेल्या तरुणांमध्ये एका १९ वर्षीय तरुणासह दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. मृतांची नावे ओंकार जगधने, अमर जगधने आणि रोहित धनुरे (सर्व रा. खानपूर) अशी असल्याचे समोर आले आहे.

दिवाळीसारख्या आनंदाच्या सणाच्या तोंडावर एकाच गावातील तीन तरुण अपघातात मृत्यूमुखी पडल्यामुळे खानपूर गावावर आणि मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती, तर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

30 IPS तडकाफडकी अधिकाऱ्यांच्या बदल्या; शहरांचे आयुक्त बदलले, कोणाची कुठे नियुक्ती?

डिलिमिटेशनवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर गंभीर आरोप, Video

Maharashtra News Live Update : राहुल गांधींची पत्रकार परिषद सुरू

Railway Mega Block : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! कल्याण-बदलापूर रेल्वे मार्गावर मध्यरात्री पॉवर ब्लॉक

EPFO New Rules: निवृत्तीनंतरही PF मधून पैसे काढता येणार; टॅक्सही लागणार नाही

SCROLL FOR NEXT