Sharad Pawar visits the cremation site of late Deputy CM Ajit Pawar at Vidya Pratishthan campus in Baramati. Saam Tv
महाराष्ट्र

मुंबईला रवाना होण्यापूर्वी शरद पवारांची अजितदादांच्या अंत्यस्थळाला भेट अन् नजर टाकताच...;

Sharad Pawar Emotional Visit To Ajit Pawar Cremation Site: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीत भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. स्मारकाच्या स्थळाची पाहणी शरद पवार यांनी केली.

Omkar Sonawane

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात २८ जानेवारी रोजी निधन झाले. अजित पवारांच्या जाण्याने फक्त बारामती नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. अजित पवार यांच्यावर बारामती एमआयडीसी येथील विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात अत्यंत शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामांमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लाखोंचा जनसागर लोटला होता. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या इमारतीचे बांधकाम ज्यावेळी सुरू होते.

ते संपूर्ण बांधकाम अजित पवार यांनी पूर्ण करून घेतले. या शैक्षणिक संकुल उभारणीत अजित पवारांचे मोठे योगदान आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर जेष्ठ नेते शरद पवार यांना मोठा धक्का बसला. ज्या दिवशी अजित पवार यांचा अपघात झाला. त्याच संध्याकाळी शरद पवार हे प्रतिक्रिया देताना प्रचंड भावुक झाले होते. त्यांचा कंठ दाटून आला होता आणि शब्द ही फुटत नव्हते. त्या दिवसापासून शरद पवार हे बारामतीमध्येच होते.

आज ते मुंबईकडे मार्गस्थ झाले. तत्पूर्वी ते थेट विद्याप्रतिष्ठानच्या मैदानाकडे गेले आणि अंत्यस्थळाकडे बघताच ते भावुक झाल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी विद्याप्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर यांच्याशी अजित पवार यांच्या स्मारकाबाबत चर्चा केली. त्यानंतर ते मुंबईकडे रवाना झाले.

किरण गुजर म्हणाले, ज्या विद्या प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलाच्या उभारणीसाठी अजित दादांनी मोठे योगदान दिले. दिवस-रात्र एक केल. त्याच मैदानावर अजित दादांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. याचीच आठवण म्हणून याच मैदानावर अजित पवार यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी स्मारक उभे करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी शरद पवार यांनी भेट देऊन पाहणी करत संबंधितांना सूचना दिल्या.

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती मृत्यू झाल्याने बारामतीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मात्र स्मारक उभारल्यानंतर अजित पवार हे स्मारकाच्या रूपाने बारामतीकरांच्या सदैव स्मरणात राहणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुणे हादरले! दिराकडून भावजयीवर जीवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार

Pre Primary School: नोंदणी अनिवार्य ! पूर्व प्राथमिक शाळांसाठी सरकार आणणार नवा कायदा

केरळमध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजप लागली कामाला ;महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी

Beed Crime: जमीन-ट्रॅक्टरसाठी नातं विसरला; जन्मदात्यासह बहीण आणि मेहुण्याला लोखंडी पाईपनं बेदम मारहाण

Rahuri By-Election: पवारांच्या नेत्याकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक, राहुरी पोटनिवडणुकीवरून राजकारण तापलं?

SCROLL FOR NEXT