उपमुख्यमंत्री अजित पवारांचं बुधवारी निधन झाल्यानंतर शनिवारी सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधीही झाला. यावरुन नाराजीचा सूर उमटतोय. शपथविधीसाठी एव्हढी घाई का? असा सवाल उपस्थित होतोय. खुद्द शरद पवारांनी शपथविधीची मला कल्पना नाही, अशी प्रतिक्रीया दिली आहे.
शुक्रवारी बारामतीत अजित पवारांच्या अस्थिंचं विसर्जन होत असताना मुंबईत राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनजंय मुंडे यांच्या गाठीभेटी आणि बैठका सुरु होत्या. राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांनाही भेटले होते. यावरुन पवार कुटुंबीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दुःखाच्या काळात सत्तेसाठी एवढी घाई करण्याची गरज काय ? असा सवाल करुन तटकरे आणि पटेलांवर पवार कुटुंब नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. दुसरीकडे राजकीय पटलावरही याचे पडसाद उमटतायेत. दुखवटा संपण्याआधीच शपथविधी होतोय, माणसापेक्षा खुर्चीला जास्त महत्व आहे, अशी टीका शिंदे सेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केलीये. तर सरकारकडे बहुमत असतानाही एवढी घाई का ? असा सवाल काँग्रेसने केला आहे.
शपथविधीला घाई का?
'राजकारणात खुर्ची जिंकली माणूस हरला'
संजय शिरसाट, सामाजिक न्यायमंत्री
'सरकारकडे बहुमत असतानाही घाई का?'
हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
काळाची गरज म्हणून घाईने शपथविधी'
अनिल पाटील, आमदार, राष्ट्रवादी (AP)
गेल्या चार दिवसांतल्या वेगवान राजकीय घडामोडींवर राज्यात चर्चा सुरु आहे. सुनेत्रा पवारांची गटनेतेपदी निवड आणि लगेच उपमुख्यमंत्रीपदासाठी शपथविधी यावरुन टीका-टिपण्णी होतेय. उपमुख्यमंत्रीपद घटनात्मक पद नाही. राज्याला एकनाथ शिंद यांच्या रुपाने एक उपमुख्यमंत्री असताना इतक्या तत्परतेने या शपथविधीची काय गरज होती, असा सूर जनमानसात उमटतोय. दरम्यान आगामी काळात तटकरे, पटेल काय भूमिका घेतात ? पडद्याआडून भाजप काय रणनिती आखणार यावर बरंच काही अवलंबून आहे. मात्र सध्याच्या सत्तेच्या सारीपाटावरच्या हालचाली राज्याच्या राजकारणावर दूरगामी परीणाम करणा-या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.