Bhima Koregaon commission has summoned Sharad Pawar Saam tv
महाराष्ट्र

Koregaon Bhima : शरद पवार यांना कोरेगाव भीमा आयोगाची नोटीस; 'त्या' पत्रात काय?

The Bhima Koregaon commission has summoned NCP chief Sharad Pawar: भीमा कोरेगाव दंगलीप्रकरणी लावलेल्या आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना नोटीस पाठवत, ३० एप्रिलपर्यंत स्वतः किंवा वकीलामार्फत हजर राहून पुराव्याचे कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Bhagyashree Kamble

Sharad Pawar: कोरेगाव भीमा दंगलीची चौकशी करणाऱ्या आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना नोटीस पाठवली आहे. तसेच ३० एप्रिलपर्यंत स्वतः किंवा वकिलामार्फत हजर राहून आपल्याकडे असलेले पुरावे आणि कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वेगळाच दावा केला आहे.

प्रकाश आंबेडकरांचा दावा

कोरेगाव भीमा येथे झालेली ही दंगल घडवून आणली होती, अशा आशयाचं पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. ते पत्र आयोगाच्या रेकॉर्डवर आणायला आयोगानं मान्यता दिली आहे. त्यासाठी आयोगाकडून पवार यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

या दंगलीबाबत शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले होते. त्या पत्रात ही दंगल घडवून आणल्याचा उल्लेख आहे, असा दावा केला होता. ते पत्र पवार यांच्याकडून मागवून घ्यावे किंवा त्याबाबत साक्ष देण्यासाठी त्यांना आयोगाने बोलवावे, अशी मागणी आंबेडकर यांनी केली होती.

हे पत्र आयोगासमोर येताच सर्व बाजू समोर येतील. त्यावेळी आयोगाला स्वतःची शिफारस करणं सोपं जाईल, असं मला वाटतं. त्यासाठी शरद पवार यांचं ते पत्र रेकॉर्डवर यावं. पवार यांचं म्हणणं जाणून घ्यावं हे आमचं म्हणणं आगोयानं ग्राह्य धरलं आहे. त्या पद्धतीनं कार्यवाही होणार आहे, असं आंबेडकर म्हणाले.

वकिलांमार्फत पवारांना नोटिस

आंबेडकर यांच्या विनंतीनुसार, ते पत्र मागवण्यासाठी शरद पवार यांना नोटीस बजावण्यात आली आहे. आंबेडकर यांचे वकील अॅड किरण कदम यांना आयोगाने पवार यांनी नोटीस पाठवण्यास मान्यता दिलीय. त्यानुसार ते पवार यांना नोटीस पाठवतील. पवार यांच्याकडं पत्र असल्यास ते पत्र पाठवतील. पत्र आयोगाकडे आल्यास, त्यानुसार पवार यांना साक्षीसाठी बोलवायचं की नाही हे ठरवण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

SCROLL FOR NEXT