Sharad Pawar On PM Narendra Modi saam tv
महाराष्ट्र

Sharad Pawar Statements: आगामी निवडणुकीत काय निकाल येईल, याची खात्री नसल्याने पंतप्रधानांची अशोभनिय वक्तव्ये - पवार

साम टिव्ही ब्युरो

Sharad Pawar press conference : पंतप्रधान नरेंद्र मोदींची वक्तव्ये पदाला अशोभनिय असल्याची टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे. पंतप्रधानांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या आरोपांबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, काल पंतप्रधानांनी समान नागरी कायद्याबाबत मत मांडलं. त्यांनी सांगितलं की एका देशात दोन कायदे कसे असू शकतात. यासंबंधी मी माझ्या पक्षाची भूमिका सांगतो.

"केंद्र सरकारने विधी आयोगाकडे हा विषय सोपवला. विधी आयोगाने देशातील विविध अशा संस्था ज्यांना या कामात रस आहे त्यांच्याकडून प्रस्ताव मागवले. विधी आयोगाकडे ९०० प्रस्ताव आले आहेत. त्यात काय म्हटलं आहे, या माहिती आम्हाला मिळालेली नाही. विधी आयोगसारखी संस्था यात खोलात जाते आणि त्यात ९०० प्रस्ताव येतात. त्याचा अर्थ याच्या खोलात जाऊन या प्रस्त्रावतून काय सूचना आहे हे पहिल्यांदा सांगण्याची गरज आहे."

"शीख, ख्रिश्चन आणि जैन समाज यांची भूमिका स्पष्ट होण्याची गरज आहे. मला काळजी याची आहे की, शीख समाजात याबाबत मत वेगळं आहे. एका गटाचा समान नागरी कायद्याला समर्थन करण्याची भूमिका नाही असे माझ्या कानावर आले आहे. या वर्गाला आणि त्यांचा मताला दुर्लक्षित करणे आणि विधी आयोगाकडे आलेल्या मंतांचा विचार न करता निर्णय घेणं योग्य होणार नाही", असे शरद पवार म्हणाले.

"पंतप्रधानांनी या प्रश्नाला हात घातला आहे तर या सर्व गोष्टींमध्ये स्पष्टता यावी. ती प्रधानमंत्र्यांनी मांडावी किंवा इतर कुणी मांडावी. त्यानंतर मी आणि माझा राजकीय पक्ष याबाबत निर्णय घेईल. पूर्ण माहिती आल्यावर निर्णय घेणे योग्य होईल" असे शरद पवार म्हणाले.

पवार म्हणाले, "माझ्या मानात शंका आहे की देशातील सध्याचं चित्र, सत्ताधाऱ्यांबाबत लोकांच्या मनात असलेली नाराजी आणि अस्वस्थता यापासून लोकांचं लक्ष दुरीकडे वळवण्यासाठी हा प्रयत्न आहे का? अशा शंकेला जागा आहे. ही अस्तस्थता प्रधानमंत्र्यांच्या मनात असावी असे वाटतं."

पुढे बोलताना पवार म्हणाले, याचं आणखी एक कारण आहे. आता एका वर्षात लोकसभा निवडणुका येतील. मधल्या काळात काही राज्यांच्याही निवडणुका आहेत. पण आजमितीला केरळपासून ते हिमाचल प्रदेशपर्यंत सत्ताधारी पक्षाचा लोकमताचा पाठींबा राज्य पातळीवर काय हे पहायची गरज आहे. देशाच्या नकाशा डोळ्यासमोर ठेवला तर, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, राजस्थान, दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यात भाजपचं राज्य नाही. म्हणजेच देशातील बहुंसख्य राज्यात भाजपचं राज्य नाही.

"गोव्यात आमदार फोडून भाजपमध्ये गेले त्यामुळे तिथे सत्ता आली. मध्य प्रदेशमध्ये देखील आमदार फोडले आणि तिथे सत्ता स्तापन केली. महाराष्ट्रात काय मी सांगत नाही तुम्ही सगळे जाणता. त्याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. याचा अर्थ असा आहे की,

गुजरात, उत्तर प्रदेश, आसाम आणि नॉर्थ ईस्टमधली मणिपूरसारखी छोटी राज्ये जिथे भाजपची सत्ता आहे तेथील परिस्थती पाहिली, तर लक्षात येतं की ते ही राज्य व्यवस्थित सांभाळू शकले नाहीत." (Marathi Tajya Batmya)

"मणिपूरमध्ये भाजपचा मुख्यमंत्री आहे, त्या मणिपूरमध्ये गेल्या 45 दिवसांपासून आग आहे. ते राज्य लोकांसाठी नाही, कायदा सुव्यवस्था तिथे दिसत नाही. तिथे काम करणाऱ्या लष्करातून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याने जाहीर स्टेटमेंट काढले की आम्ही हिंदुस्तानचे नागरिक आहोत की नाही अशी शंका आमच्या मनात आहे. अशी स्थिती या राज्यात आहे. या सर्व राज्यांची परिस्थीती पाहिली तर कळतं ही भाजपला ती संभाळता आली नाहीत. बहुसंख्य राज्ये त्यांच्या हातात नाही, त्यामुळे आगामी निवडणुकीतून काय निर्णय होईल याची खात्री नसल्याने पंतप्रधानांनी त्यांच्या पदाला अशोभनिय अशी वक्तव्ये केली." (Latest Political News)

पवार म्हणाले, माझ्या पक्षाबाबत त्यांनी मत व्यक्त केले. मुलीला प्रोत्साहन द्यायचं असेल तर राष्ट्रवादीला मत द्या. खरंय, माझी मुलगी तीन वेळी स्वतःच्या कर्तृत्वाने निवडून आली. एखाद्या निवडणुकीला बापजाद्यांची पुण्याई उपयोगी पडते. पण नंतर संसदेत 98 ते 99 टक्के उपस्थिती आणि जास्तित जास्त सहभाग यात त्यांचा क्रमांक उच्च दर्जाचा आहे. जी संस्था संसदेतील कामकाजाचा अभ्यास करते आणि पुरस्कार देते, त्या संस्थेकडून त्यांना 8 वेळा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे मोदीसाहेबांनी काही सांगितलं, तरी कर्तुत्व असल्याशिवाय या देशातील मतदार नेहमी मत देत नाही. त्यामुळे त्यांचं हे वक्तव्य अशोभनिय आहे असे शरद पवार म्हणाले. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT