Fawad Khan Diagnosed With Diabetes: बापरे! वयाच्या १७ व्या वर्षी फवादचं ८ दिवसांत घटलं होतं १० किलो वजन; मुलाखतीत सांगितलं नेमकं कारण
Fawad Khan Health News: फवाद खान पाकिस्तानातच नाही तर भारतातही खूप लोकप्रिय आहे. त्याने काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील काम केलंय. त्याने 'जिंदगी गुलजार है' आणि 'हमसफर' या दोन मालिकेतून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला. अनेक युजर्सने त्याला अभिनय येत नाही, अशी त्यावर टिका केली.
फवादने नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे. अभिनेता फवाद खानने वयाच्या १७ व्या वर्षी Type 1 Diabetes झाला होता. या टप्प्यावर जर त्याने आपल्या आरोग्याची काळजी घेतली नसती तर त्याला Type 2 Diabetes होऊ शकला असता. मात्र, त्याने त्याचा सामना केला आणि या आजारावर मात केली.
एका मुलाखतीत फवाद खानने Type 1 Diabetes आणि त्याच्या तब्येतीबद्दल भाष्य केले आहे. मुलाखतीत फवाद खान म्हणतो, आजाराचे निदान झाल्यावर आणि उपचारादरम्यान त्याने सुमारे १० किलो वजन कमी केल्याची माहिती दिली आहे. जेव्हा मी १७ वर्षांचा होतो, तेव्हा माझी बॉडी ऑटो-इम्यून रिस्पॉन्सला प्रतिसाद देत होती. मला खूप ताप आला, त्यानंतर आठ दिवसात माझे वजन १० किलो कमी झाले. माझं वजन आधी ६५ किलो होतं त्यानंतर ५५ किलो झालं.
फवाद खान पुढे मुलाखतीत म्हणतो, “दुसर्याच दिवसापासून, मला खूप तहान लागायची सोबतच लघवीला देखील खूपच यायची.” ही पॉलीयुरिया नावाची एक स्थिती आहे, याचा अर्थ असा की, आपण भरपूर पाणी पित असल्याने आपल्याला लघवीसाठी अधिक वेळा बाथरूममध्ये जावे लागते. मुलाखतीत पुढे फवाद म्हणाला, “मी सहा- सात लिटर पाणी प्यायलो तरी ही मला तेवढं पाणी कमी वाटायचं. आणि मला डिहायड्रेट झाल्यासारखे वाटायचं.”
Type 1 Diabetes च्या उपचारांचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम झाला यावर फवाद म्हणतो, “मला थकवा जाणवत होता. मी शाळेत खूप खेळायचो. प्रत्येक खेळामध्ये माझा सक्रिय सहभाग असायचा, पण डायबेटिस आजार झाला हे कळाल्यावर मी खेळणं फार कमी केलं. त्या आजारामुळे मी माझं खेळातील रस पूर्णपणे गमावला. मला Type 1 Diabetes या आजाराबद्दल कळाल्यावर पहिले दोन- तीन महिने नेहमी थकल्यासारखे वाटायचे.”
Type 1 Diabetes या आजारतून वाचण्यासाठी तुम्ही काय कराल...
घरातील कोणत्या सदस्याला जर Type 1 Diabetes असेल तर इतर सदस्यांनीही तपासणी करावी.
ज्यावेळी लहान बाळांना पहिल्यांदा ठोस आहार दिला जातो त्यावेळी लहान बाळांना Type 1 Diabetes होण्याची शक्यता आहे. ज्या बाळांना आनुवंशिक आजाराची जोखीम जास्त असते, त्यांना चार ते सहा महिने उशिराच ठोस आहार सुरु करणे फायदेशीर ठरू शकते.
काही सँपल्स Type 1 Diabetes यांच्यात व्हिटॅमिन डीची कमतरता दाखवतो. त्यामुळे आपल्या शरीरात पोषक तत्वाची कमतरता होऊ देऊ नका.
निरोगी राहण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
रक्तातील साखरेची पातळी कंट्रोलमध्ये ठेवा.
नेहमीच आरोग्य तपासणी करा...
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.