Kiran Mane On Ashadhi Ekadashi Special Post
Kiran Mane On Ashadhi Ekadashi Special PostSaam Tv

Kiran Mane Post: ‘शुटिंग संपल्यावर साक्षात पांडूरंगाच्या चरणावर...’ म्हणत किरण मानेने शेअर केली लाडक्या विठुरायासाठी पोस्ट

Kiran Mane Shared Post On Ashadhi Ekadashi: आज आषाढी एकादशीनिमित्त सअनेक मराठी सेलिब्रिटी विठुरायाच्या भक्तीत दंग झालेय.
Published on

Kiran Mane On Ashadhi Ekadashi Special Post: आज आषाढी एकादशीनिमित्त सर्वच भक्त विठुरायाच्या भक्तीत दंग झालेय. यामध्ये अनेक मराठी सेलिब्रिटींनी देखील विठुराया आणि वारकऱ्यांसाठी पोस्ट केल्या आहेत. नुकतंच टेलिव्हिजन अभिनेता किरण माने याने लाडक्या विठुरायासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

Kiran Mane On Ashadhi Ekadashi Special Post
Anushka Sharma And Karan Johar News: करण जोहर विरोधात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करणार होती, पण..., अनुष्का शर्माने सांगितली मनातील सल

नेहमीच सोशल मीडियावर किरण माने सक्रिय असतो. नुकतंच त्याने लाडक्या विठुरायासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. किरण माने म्हणतो, “मागच्या वर्षीची लै भारी आठवण !शुटिंगच्या निमित्तानं लै ठिकानी फिरलोय आजपर्यन्त... पन गेल्या वर्षी आयुष्यात पयल्यांदा अशा ठिकानी शुटिंग केलं जिथं माझ्या इठूरायाचा वास हाय... जिथं गेल्यावर माझा तुकोबा 'पुन्हा जन्मा नाही आला' अशा अवस्थेला पोचला होता...”

पंढरी पंढरी । विठूरायाची नगरी ।।
भोंवता भिंवरेचा वेढा । मध्यें पंढरीचा हुडा ।।
गस्त फिरे चहूं कोनीं । टाळ मृदंगांची ध्वनी ।।
ऐसे स्थळ नाहीं कोठें । तुकयाला विठ्ठल भेटे ।।

किरण माने पुढे पोस्टमध्ये म्हणतो, “...अशा माझ्या इठूरायाच्या नगरीत 'शेमारू मराठीबाणा'च्या आषाढी एकादशी विशेष कार्यक्रमाचं शूटिंग झालं. कॅमेर्‍यापुढं उभं राहून वारकरी संप्रदायाची, वारीची, संतांची माहिती सांगताना भान हरपून गेलं ! चंद्रभागेच्या वाळवंटात पाऊल ठेवल्या-ठेवल्या, याच जागेवर जातीपातीच्या भिंती तोडून चोखा महार,जनाबाई,नरहरी सोनार, गोरा कुंभार, सावता माळी, पंजाबातून आलेला जाल्हण सुतार अशा अठरा पगड जातीच्या संतांचा मेळा भरवून वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवणारे नामदेव महाराज डोळ्यांपुढे दिसले. ”

Kiran Mane On Ashadhi Ekadashi Special Post
Marathi Celebrities Ashadhi Ekadashi : विठुरायाच्या भक्तीत लीन, मराठी कलाकारांची आषाढी एकादशीनिमित्त खास पोस्ट

किरण माने पुढे पोस्टमध्ये म्हणतो, “गोपाळपुरा, विष्णूपद मंदिर, भुलेश्वर, पद्मावती... जाईन तिथं, 'माझ्या तुकोबारायाची पावलं याच मातीत पडली असतील, याच भवतालात त्यानं श्वास घेतला असेल' या विचारानं हरखून गेलो ! जाईन तिथं 'किरण माने,किरण माने' ओरडत फॅन्सची गर्दी धावत येत होती... कॅमेरामन, डायरेक्टर, इ.पी. वगैरे मंडळींना गर्दीला कंट्रोल करताना नाकी नऊ येत होते....”

Kiran Mane On Ashadhi Ekadashi Special Post
Madona Hospitalize: जगप्रसिद्ध पॉप सिंगर मॅडोनाची तब्येत अचानक बिघडली, ICUमध्ये भरती...

पोस्टच्या शेवटच्या भागात किरण माने म्हणतो, “शुटिंग संपल्यावर साक्षात पांडूरंगाच्या चरणावर मस्तक ठेवून आलो. चोखोबाच्या समाधीपुढे नतमस्तक झालो. संत नामदेवांचं जन्मस्थान पाहिलं. त्यांचे १६ वे वंशज ह.भ.प. माधवमहाराज नामदास यांच्या घरी पाहूणचार घेतला....”

“पंढरीसी नाहीं कोणा अभिमान । पायां पडे जन एकमेका ।।" या ओळी साक्षात अनुभवताना माझ्या आज्ज्याची आठवण आली आणि मन भरून आलं...”

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com