Madona Hospitalize: जगप्रसिद्ध पॉप सिंगर मॅडोनाची तब्येत अचानक बिघडली, ICUमध्ये भरती...

Madona News: प्रसिद्ध अमेरिकन पॉप सिंगर मॅडोना गेल्या काही दिवसांपासून बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे आयसीयूमध्ये दाखल आहे.
Madona Health Update
Madona Health UpdateInstagram
Published On

Madona Health Update: हॉलिवूड इंडस्ट्रीमधून वाईट बातमी आहे, प्रसिद्ध अमेरिकन पॉप सिंगर मॅडोना गेल्या काही दिवसांपासून बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे आयसीयूमध्ये दाखल आहे. मॅडोनाचे मॅनेजर गाय ओसेरी यांनी ही माहिती गायिकेच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तिचा मॅनेजर म्हणतो, मॅडोनाला गेल्या शनिवारी बॅक्टेरियल इन्फेक्शनचा संसर्ग झाला होता, त्यामुळे तिला काही दिवस ICU विभागात ठेवावे लागले. गायिकेच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे तिचे पुढील सर्वच शो देखील पुढे ढकलावे लागले आहेत.

Madona Health Update
Sonam Kapoor Comeback: बॉलिवूड अभिनेत्री ४ वर्षांनी वेगळ्या भूमिकेत दिसणार; पहिल्यांदाच OTT वर एन्ट्री

मीडिया रिपोर्ट्सनुसार, चेरिशमधील कार्यक्रमादरम्यान मॅडोनाला बॅक्टेरियल इन्फेक्शनचा संसर्ग झाला होता. मॅडोनाचा मॅनेजर गाय ओसेरीने दिलेल्या माहितीनुसार, 64 वर्षीय मॅडोनाच्या तब्येतीत सुधारणा होत असली तरी ती अजूनही डॉक्टरांच्या अंडर ऑब्जर्वेशन आहे. डॉक्टर तिच्या पूर्ण बरे होण्याची प्रतीक्षेत आहे.

एका इंग्रजी संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, मॅडोना तिच्या शोसाठी सलग १२ तास काम करत होती. आपल्या शोसाठी ती सतत सराव देखील करायची. २४ जून रोजी मेडोना बेशुद्धावस्थेत आढळून आल्याने तिला लगेचच रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मॅडोनाच्या आजारपणात तिची मुलगी लॉर्डेस लिओन देखील प्रत्येक क्षणी तिच्यासोबत असून सध्या तिची काळजी घेत आहे.

Madona Health Update
Pravin Tarade Post : पन्नास वर्ष चालत जातायेत... आषाढी एकादशीदिवशी प्रवीण तरडेने शेअर केली आई-वडिलांचा भावनिक किस्सा

मॅडोनाचे अनेक गाणे हिट झाले असून तिला आतापर्यंत सात वेळा ग्रॅमी पुरस्कार जिंकला आहे. तिची आंतरराष्ट्रीय संगीत क्षेत्रात चांगली ओळख असून नेहमीच ती आपल्या गाण्यांमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. मॅडोनाला तिच्या "मॅडम एक्स"च्या टूर दरम्यान झालेल्या अपघातामुळे २०२० मध्ये हिप रिप्लेसमेंट सर्जरी करावी लागली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com