PM Modi Plan for 2024 Elections : लोकसभा निवडणुकीआधी PM मोदी अॅक्शन मोडमध्ये; मंत्र्यांना दिला 'कानमंत्र'

PM Modi Strategy for 2024 Lok Sabha Election : पुढच्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीआधीच भाजपनं 'अॅक्शन प्लान' तयार केल्याचे दिसते.
PM Narendra Modi Latest News
PM Narendra Modi Latest NewsSAAM TV

PM Modi Strategy for 2024 Lok Sabha Election : केंद्रातील मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झालेली असतानाच, भाजप पुढच्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना 'मंत्र' दिला आहे. आगामी निवडणूक ही वंचितांना डोळ्यांसमोर ठेवून होणार आहेत. अशावेळी मंत्रालयाच्या योजना किंवा धोरणे त्यादृष्टीने तयार केली जावीत, अशा सूचना मोदींनी संबंधित मंत्र्यांना दिले आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी संबंधित मंत्र्यांना थेट सूचना दिल्या आहेत. आपापल्या मतदारसंघातील गरीब, शोषित आणि वंचितांवर विशेष लक्ष केंद्रीत करावे. संबंधित मंत्रालयांतील योजना गरीब आणि मध्यमवर्गीयांना डोळ्यांसमोर ठेवून तयार करण्याता याव्यात, असे आदेश मोदींनी मंत्र्यांना दिले आहेत. आपापल्या मतदारसंघांमध्ये बैठका, सेमिनार घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. मंत्रालयांमध्ये गतीमान आणि सृजनशीलतेवर भर देताना हेच धोरण अवलंबून यापुढील कामे करावीत, असेही मोदींनी मंत्र्यांना सांगितले.

PM Narendra Modi Latest News
Agriculture News: ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मोदी सरकारची सर्वात मोठी घोषणा

२०२४ मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत. भाजपने आतापासूनच तयारी केली आहे. संपूर्ण तयारीनिशी भाजप निवडणूक आखाड्यात उतरणार आहे असे चित्र दिसते. भाजप निवडणूक मोडमध्ये आला असून, त्याचे नेतृत्व खुद्द नरेंद्र मोदी करत आहेत.

भाजप खासदारांची आढावा बैठक होणार

मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. सत्ताधारी भाजपदेखील पूर्ण सक्रिय झाला आहे. भाजपने महाजनसंपर्क अभियान सुरू केलं होतं. त्यात खासदारांच्या सहभागाबाबत आता समीक्षा बैठक होणार आहे. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा हे भाजप खासदारांची बैठक घेण्याची शक्यता आहे. ही बैठक पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, सर्व खासदारांना अभियान आणि कामाची माहिती नमो अॅपवर अपलोड करण्यास सांगण्यात आले आहे. याच आधारे सर्वांच्या कामाचा अहवाल तयार केला जाणार आहे. (Political News)

PM Narendra Modi Latest News
Uniform Civil Code News: समान नागरी कायदा लवकरच लागू होणार? मोदी सरकारला मिळालं बड्या नेत्याचं समर्थन

बैठकांचं सत्र सुरूच

अमेरिकेच्या दौऱ्यावरून मायदेशी परतल्यानंतर पंतप्रधान मोदी अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. आतापर्यंत त्यांनी ठिकठिकाणी बैठका घेतल्या आहेत. मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह त्यांनी नुकतीच बैठक घेतली.

या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, बीएल संतोष यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. या बैठकीत समान नागरी कायदा, सरकार आणि संघटनात्मक बदल, विधानसभा आणि लोकसभा निवडणूक आदी महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळातही फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com