Good News For Sugercane Farmers: ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मोदी सरकारने ऊसाच्या खरेदी दरात (एफआरपी) प्रति क्विंटल १० रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
जून अखेरीस सुरू झालेला पाऊस आणि सततच्या तापमानवाढीमुळे भूगर्भातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. परिणामी शेतकऱ्यांनी पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलेला ऊस डोळ्यादेखतच करपून जात आहे. यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
केंद्र सरकारने ऊसाच्या (Sugercane) खरेदी दरात (एफआरपी) वाढ करावी, अशी मागणी वारंवार शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. शेतकऱ्यांची ही मागणी लक्षात घेऊन यापूर्वी कृषी खर्च मूल्य आयोगाने ऊस खरेदी दरात वाढ करण्याची केंद्राकडे शिफारस केली होती.
हीच बाब लक्षात घेता मोदी सरकारने ऊसाच्या खरेदी दरात प्रतिक्विंटल १० रुपये इतकी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या ३०५ रुपये प्रति क्विंटल असलेले ऊसाचे दर ३१५ रुपये प्रति क्विंटल होणार आहे. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना (Farmers) मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने वाढवलेला एमएसपी १ ऑक्टोबर २०२३ पासून सुरू लागू होईल. विशेष बाब म्हणजे गेल्या ९ वर्षात मोदी सरकारने ऊसाच्या एफआरपीमध्ये प्रति क्विंटल एकूण १०५ रुपयांनी वाढ केलेली आहे.
२०२१ मध्ये ऊसाचा एमएसपी ५ रुपयांनी वाढवून २९० रुपये करण्यात आला होता. २०२२ मध्ये त्यात १५ रुपयांनी वाढ करून ३०५ रुपये करण्यात आली. आता १० रुपयांनी वाढ झाल्याने नव्या हंगामात उसाची एफआरपी ३१५ रुपये होणार आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.