sharad pawar, eknath shinde, export duty on onion, satara news saam tv
महाराष्ट्र

Sharad Pawar-Eknath Shinde: हाे, १० वर्ष हाेताे मी कृषिमंत्री पण..., शरद पवारांकडून CM एकनाथ शिंदेंच्या टीकेचा समाचार (पाहा व्हिडिओ)

Export Duty Onion : महाराष्ट्रात कांद्याचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

ओंकार कदम

Sharad Pawar In Dhaiwadi : कांद्याची कधीच अशी अवस्था झाली नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितल शरद पवार 10 वर्ष शेतीमंत्री होते. त्यांनी जेवढा कांदा खरेदी केला नाही तेवढा आम्ही केला. पण त्यांना सांगायचं आहे, शरद पवारांनी कधीच कांदा उत्पादकांवर कर बसवला नाही असे प्रत्युत्तर आज (शुक्रवार) माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार (Sharad Pawar On Onion Export Duty) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्या टिकेस दहिवडी येथे दिले. (Maharashtra News)

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आज काेल्हापूर येथे सभा हाेणार आहे. त्यापूर्वी त्यांचा दहिवडी येथे मेळावा झाला. या मेळाव्यात शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या कारभाराविषयी टीका केली. पवार म्हणाले मणिपूर आणि अन्य राज्यात गंभीर घटना घडत आहेत. परंतु केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेत आहे अशी खंत पवार यांनी व्यक्त केली.

पवार म्हणाले माझ्या मनात एक गोष्ट कायम आहे. महाराष्ट्राचे नेतृत्व ज्या यशवंतराव चव्हाणांनी केलं त्यांच्या पाठीशी हा तालुका कायम राहिला. आज ज्यांच्या हातात राज्याची आणि देशाची सत्ता आहे त्यांना या प्रश्नांची किती जाण आहे हे दिसून येते. दुष्काळी परिस्थितीमुळे लोक अस्वस्थ आहेत. नाशिकमध्ये पण हेच चित्र आहे. ज्यांच्या हातात सत्ता त्यांची ही जबाबदारी आहे. या लोकांच्या पाठीशी उभारण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न हाेत नाहीत.

साधं ढुंकुन पण बघत नाहीत हे लाेक अशी टीका करत पवार यांनी गेल्या 15 दिवसांत यवतमाळ जिल्ह्यात 21 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. चौकशी केली तर चारा , पाणी नाही दुष्काळी परिस्थिती डोक्यावर कर्जाचा ओझं. त्यापेक्षा जीव दिलेला बरा म्हणून आत्महत्या केली हे दृश्य महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगले नाही असे पवार यांनी नमूद केले.

मुख्यमंत्र्यांच्या टिकेस पवारांचे उत्तर

शरद पवार 10 वर्ष कृषीमंत्री होते त्यांनी जेवढा कांदा खरेदी केला नाही तेवढा आम्ही केला या मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा पवार यांनी आज भाषणातून समाचारा घेतला. ते म्हणाले त्यांना मला इतकेच सांगायचं आहे की शरद पवारांनी कधीच कांदा उत्पादकांवर कर बसवला नाही. त्यांचा माल जगात काेठेही विकण्यासाठी थांबवला गेला नाही.

कवड्याच्या माळा घाला...

त्यावेळी माझ्यासमाेर भाजपचे लाेक कांद्याच्या माळा घालून आले. त्यावेळी मी त्यांना सांगितले कांद्याची किंवा कवड्याची माळ घालून या. कांद्याला कधी नाही ताे भाव मिळत आहे. शेतक-याला दाेन पैसे मिळत आहेत. त्यामुळे त्याच्यावर कर लादणार नाही हे सभागृहात स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed : ओबीसी आरक्षण बचावासाठी टोकाचे पाऊल; बीड जिल्ह्यातील घटनेने खळबळ

Maharashtra winter : गरम कपडे तयार ठेवा! यंदा महाराष्ट्रात हाडं गोठवणारी थंडी, तज्ज्ञांनी सांगितलं कारण, वाचा सविस्तर

Health facts: उभं राहून पाणी प्यायल्याने खरंच गुडघेदुखीचा त्रास होतो? वैज्ञानिक दृष्टिकोनातून सत्य काय, वाचा!

Rented House : रेंटवर राहणाऱ्यांच्या कामाची बातमी, जाणून घ्या तुमचे हक्क आणि कायदेशीर नियम

आई अन् मुलानं १३ व्या मजल्यावरून उडी मारली; पती झोपलेला असताना आयुष्य संपवलं, सुसाईड नोटमधून माहिती उघड

SCROLL FOR NEXT