Video Viral: कामासाठी अधिकारी पैसे मागत असतील तर त्यांना चप्पलने हाणा : अजित पवार गटाच्या आमदारांचा नागरिकांना सल्ला

mla balasaheb ajabe news : त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Beed, mla balasaheb ajabe
Beed, mla balasaheb ajabesaam tv

Beed News : काेणत्याही याेजनेतील कामासाठी अधिकारी पैसे घेत असतील तर त्यांना चप्पलने मारा, बघू काय होत ते असा सल्ला बीड जिल्ह्यातील आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब आजबे (mla balasaheb ajabe) यांनी नागरिकांना दिला आहे. स्वातंत्र्यदिनी (independence day 2023) एका कार्यक्रमात आमदार आजबे बाेलत हाेेते. (Maharashtra News)

Beed, mla balasaheb ajabe
Satara News : छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणार्‍याला पकडले आहे, मास्टर माईंडचा शाेध सुरू : शंभूराज देसाई

15 ऑगस्टला आमदार बाळासाहेब आजबे यांच्या अध्यक्षतेखाली एका आढावा बैठकीत काही शेतकऱ्यांनी अधिकारी कामासाठी पैसे मागतात अशी तक्रार आजबे यांच्याकडे केली. त्यावेळी आमदार आजबे यांनी उपस्थितांसमाेर अधिका-यांना झापले.

Beed, mla balasaheb ajabe
Tomato Price Drop In Nashik : बाजार समितीत टाेमॅटाेचा दर काेसळू लागला, जाणून घ्या महत्त्वाचे कारण

आमदार आजबे म्हणाले हे जर खरं असेल तर मी आत्ता एक पत्र दिलं तर तुमची वाट लागेल असेही अधिकाऱ्यांना सुनावले. शेतकऱ्याकडून पैसे घ्यायचे तर रेट कार्ड ठरवा असेही आजबे यांनी नमूद केले.

विहिरीसाठी पैसे, घरकूलासाठी पैसे मागत असतील तर हे चुकीचे आहे. इथून पुढं जो अधिकारी, कर्मचारी पैसा मागेल त्याला तिथेच चपलेने मारा, बघू काय हाेतेय असा सल्ला वजा आदेशच आमदार बाळासाहेब आजबे यांनी उपस्थित नागरिकांना दिला.

दरम्यान आमदार आजबे हे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अजित पवार गटाचे आमदार आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com