Sharad Pawar Saam tv
महाराष्ट्र

Sharad Pawar : नीलम गोऱ्हेंनी असं बोलायला नको होतं, शरद पवारांची प्रतिक्रिया; राऊतांच्या वक्तव्याशीही असहमत

Sharad Pawar Latest News : नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या वक्तव्यावर शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी तसं वक्तव्य करायला नको होतं, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.

Vishal Gangurde

दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असं वक्तव्य शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाबद्दल केलं होतं. यानंतर ठाकरे गटाकडून त्यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. आता यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नीलम गोऱ्हे यांनी असं भाष्य केलं नसतं तर बरं झालं असतं असं सांगून आता वादावर पडदा टाकायला हवा, असं पवार सूचवलं. याशिवाय राऊतांच्या वक्तव्याशीही असहमती दर्शवली.

शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शरद पवार यांनी राज्यातील विविध विषयांवर भाष्य केल. नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना शरद पवार म्हणाले, 'नीलम गोऱ्हे यांनी ते वक्तव्य करायची गरज नव्हती. नीलम गोऱ्हे यांनी असं भाष्य केलं नसतं तर, योग्य झालं असतं. संजय राऊत यांनी जे म्हटलं, ते १०० टक्के बरोबर होतं. नीलम गोऱ्हे यांना ४ टर्म आमदारकी कशी मिळाली हे सर्वांना माहीत आहे'.

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

शरद पवार म्हणाले, 'मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांच्या नेतृत्वातील दोन्ही कार्यक्रम यशस्वी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम वेगळ्या ठिकाणी होता. त्या कार्यक्रमानंतर तीन कार्यक्रम होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला मोठी गर्दी होती. या कार्यक्रमाला देशाच्या कानाकोपऱ्यातून ६ ते ७ हजार लोक आले होते. या कार्यक्रमाला प्रतिसाद चांगला होता. मराठी साहित्य संमेलनाचा कार्यक्रम चांगला झाला, असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही'.

'नीलम गोऱ्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही काम केलं आहे. त्या पुढे शिवसेनेत गेल्या. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात त्यांनी काम केलं. सध्या त्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत काम करत आहेत. त्यांनी कमी कालावधीत चार पक्षांचा अनुभव घेतला आहे. त्यांचा अनुभव लक्षात करायला, त्यांनी भाष्य केलं नसतं तर योग्य ठरलं असतं. यासंदर्भात संजय राऊतांची घेतलेली भूमिका योग्य आहे. नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यावर संमेलनाचे आयोजक आहेत, त्यांनी नापंसती दर्शवली आहे. आता या सर्व सकळ्यावर पडदा टाकायला कोणतीही हरकत नाही, असे शरद पवार पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई नाशिकमध्ये दाखल

Relationship Tips: सारखं भांडण होतं; नातं घट्ट करण्यासाठी जोडीदारानं कराव्यात या खास गोष्टी

Fake Notes : नकली नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तीन जाणांविरोधात गुन्हा दाखल

Train Ticket Conformation Tips : दिवाळीला गावी जायचंय, पण तिकीट कन्फर्म नाही, 'या' टिप्स करा फॉलो

निवडणूक आयोगाला 2 लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा जोरदार दणका, काय आहे प्रकरण? VIDEO

SCROLL FOR NEXT