Neelam Gorhe : निलम गोऱ्हेंच्या माजी ओएसडीवर गुन्हा,नोकरीचे आमिष दाखवून ९ लाख उकळले

Neelam Gorhe News Udpate : निलम गोऱ्हे यांच्या माजी ओएसडीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी पोलिस अधिकाऱ्याला फसवल्याप्रकरणी माहिम पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Neelam Gorhe News : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केल्यामुळे निलम गोऱ्हे सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेत आहे. राज्याच्या राजकारणात गोऱ्हे यांची चर्चा होत असतानाच त्यांच्या माजी ओएसडीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोकरीचे आमिष दाखवून ९ लाख रूपये उकल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निलम गोऱ्हे यांच्या कार्यलयातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. निलम गोऱ्हे यांचे माजी ओएसडी सचिन चिखलीकर आणि त्याचा जोडीदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. सरकारी नोकरीचे आमिष दाखवून ९ लाख रूपये उकळल्याचा आरोप आहे.

सचिन चिखलीकर यानं निवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाला मंत्रालयात, रेल्वेमध्ये नोकरी लावून देतो, असा आरोप आहे. सचिन चिखलीकर याला निलम गोऱ्हे यांनी नोकरीवरून काढून टाकले आहे.

Neelam Gorhe
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंपाचे संकेत, उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची तिसऱ्यांदा भेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com